Next
गणेशरूपांचा चित्रमय आविष्कार
BOI
Friday, April 20 | 05:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : १४ विद्या आणि ६४ कलांची अधिष्ठात्री देवता असलेल्या श्रीगणेशाच्या विविध रूपांचा पट चित्रकार सचिन माधव जोशी यांनी चित्रांच्या माध्यमातून मांडला आहे. गणपतीची विविध रूपे दर्शविणाऱ्या त्यांनी काढलेल्या चित्रांचे ‘देवा तुचि गणेशु’ हे प्रदर्शन सध्या पुण्यातील बालगंधर्व कलादालनात भरले आहे. शनिवारी, २१ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी साडेसात या वेळेत हे रसिकांसाठी खुले असणार आहे.

गणपतीची विविध रूपांतील ५० चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. गणेशपुराणात वर्णिलेल्या गणरायाच्या रूपांचे वर्णन जोशी यांनी चित्रांतून साकारले आहे. यात प्रामुख्याने बटूस्वरूप गणेश, पेटी वाजविणारा गणेश, धूम्रवर्ण, धनगणेश, ध्यानस्वरूप, मूषकवाहन, सर्पगणेश, हरिद्रागणपती, महागणपती, सिंहगणेश, विजयगणेश, नृत्यगणेश अशी गणेशाची विविध रूपे चितारण्यात आली आहेत. यासाठी पेन्सिल, पेन अँड इंक या माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. तसेच काही चित्रे संगणकीय माध्यमातूनही रंगविण्यात आली आहेत.

चित्रकार सचिन माधव जोशी हे कलेच्या क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे; मात्र त्यांचा स्वभाव प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा असल्यामुळे त्यांच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. एका कलावंताला, त्याच्या कलेला मित्रांनी आणि रसिकांनी दिलेली ही एक खरीखुरी दाद आहे.

(सचिन जोशी यांच्या या चित्रप्रदर्शनाची झलक, चित्रकार अनिल उपळेकर यांनी सचिन जोशी यांच्याशी साधलेला संवाद आपल्याला सोबतच्या व्हिडिओत पाहता येईल.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link