Next
‘तंबाखूविरोधी लढ्यात बहुआयामी प्रयत्न गरजेचे’
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘३१ मे हा दर वर्षी ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ‘टोबॅको अँड लंग हेल्थ’ ही आहे. फुप्फुसाच्या होणार्‍या कर्करोगांमध्ये बहुतांश तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे कारणीभूत ठरते. तंबाखूच्या हानीकारकतेबाबत अनेक उपाययोजना व जनजागृती कार्यक्रम होत असतात; मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर तरूण लोक या सवयीला बळी पडत आहेत. याविरूद्ध लढा उभा करण्यासाठी बहुआयामी प्रयत्न गरजेचे आहेत,’ असे मत सह्याद्री हॉस्पिटल्समधील आँकोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील यांनी मत व्यक्त केले. 

ते म्हणाले, ‘दर वर्षी अनेक लोक तंबाखूमुळे झालेल्या फुप्फुसाचा कर्करोग किंवा इतर रोगांमुळे मृत्यूमुखी पडतात. धुम्रपानामुळे समोरच्या व्यक्तीवरदेखील परिणाम होतो (पॅसिव्ह स्मोकिंग). त्याचबरोबर लहान मुलांसमोर धुम्रपान केल्यास त्यांना भविष्यात अस्थमा, न्युमोनिया, ब्राँकॅटिस किंवा इतर श्‍वसनाच्या आजारांचा धोका बळावू शकतो. त्यामुळे एक समाज म्हणून आपण कुणालाही लहान मुलांसमोर धुम्रपान करू देता कामा नये. तंबाखूचा वाईट परिणाम हा फक्त कर्करोग नसून, यामुळे हृदयरोग, सीओपीडी, गँगरीन, स्ट्रोक अशा अनेक आजारांची जोखीम उद्भवू शकते. त्यामुळे धुम्रपान व तंबाखूचे सेवन तत्काळ सोडणे हाच उपाय योग्य आहे. यासाठी मनापासून व चिकाटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search