Next
भिवंडीत उभी राहिली जिल्हा परिषदेची पहिली वातानुकूलित शाळा
खांडपे शाळेचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात
मिलिंद जाधव
Monday, March 04, 2019 | 11:53 AM
15 0 0
Share this article:



भिवंडी : सध्या सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत असतानाच आपल्याही गावातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून खांडपे गावातील नागरिकांच्या मदतीने भिवंडी तालुक्यातील भिनार केंद्रातील खांडपे जिल्हा परिषद या पहिल्या वातानुकूलित शाळेचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी भिनार केंद्राचे केंद्रप्रमुख निहाल शेख, मुख्याध्यापिका राधा येवते, ठाणे जिल्हा मजुर फेडरेशन संचालक पंडित पाटील, हनुमान पाटील, सोमनाथ पाटील, शिक्षक प्रशांत भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निलम पाटील, सोमनाथ पाटील, फशीबाई तारे, भारती हजारे, अमोल तारे मंडळ, खांडपे गावातील गावकऱ्यांच्या उपस्थितीत वातानुकूलित शाळेचे उद्घाटन करण्यात आले. अवघ्या दोन महिन्यांत ही शाळा सुशोभित करण्यात आली असून, आकर्षक चित्रे, शौचालय, फिल्टरचे पाणी, रंगरंगोटी अशी ही शाळा डिजिटल करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची खांडपे शाळा ही भिवंडी तालुक्यातील पहिली वातानुकूलित शाळा असल्याने गावकऱ्यांच्या सहकार्याचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. खांडपे शाळेच्या जीर्णोद्धारासाठी अथक परिश्रम घेतलेल्या मुख्याध्यापिका राधा येवते, शिक्षक प्रशांत भोसले यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वच्छ शाळा निर्माण करणे, मराठी शाळा टिकवून ठेवत दर्जेदार शिक्षण देणे हा मुख्य उद्देश समोर ठेऊन ही शाळा आम्ही साकारल्याचे या वेळी सांगण्यात आले.

‘शिक्षक, गावकरी आणि इतर देणगीदाररांच्या प्रयत्नाने ‘माझे गाव, माझी शाळा’ या माध्यमातून शाळेचा जीर्णोद्धार झाला आहे. इतर गावांनी, शाळांनी येथे शाळेला भेट देऊन येथील एकीचा आदर्श घ्यावा,’ असे विचार भिनारचे केंद्रप्रमुख निहाल शेख यांनी व्यक्त केले.



‘गावोगावी अशा शाळा उभ्या रहाव्यात. शिक्षकांनी शाळेसाठी अधिकचा वेळ देऊन गुणवत्ता वाढवावी. मराठी भाषा व मराठी शाळा टिकवणे हे शिक्षक करू शकतात; पण यासाठी प्रामाणिक प्रयत्न हवा,’ असे शिक्षक प्रशांत भोसले यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search