Next
पुढील वर्षी भारतात निर्माण होणार ११ लाख नोकऱ्या
‘टीमलीज एम्प्लॉयमेंट आउटलूक रिपोर्ट’चा निष्कर्ष
प्रेस रिलीज
Saturday, May 11, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : टीमलीज सर्व्हिसेस या भारतातील सर्वांत मोठ्या स्टाफिंग फर्मने एप्रिल-सप्टेंबर २०१९-२० या अर्धवर्षासाठी द्विवार्षिक ‘एम्प्लॉयमेंट आउटलूक रिपोर्ट’ नुकताच जाहीर केला आहे. यात या अर्धवर्षात नेट एम्प्लॉयमेंट आउटलूकमध्ये तीन टक्क्यांनी वाढ होईल व ११.५ लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती होईल, असे अहवालात नमूद केले आहे. 

अहवालानुसार, अंदाजे ५७ टक्के उद्योगांच्या बाबतीत त्यांच्या नेट एम्प्लॉयमेंट आउटलूकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चार टक्के वाढ नोंदवून ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी आणि बीपीओ/आयटीईएस क्षेत्रे आघाडीवर आहेत व त्यामुळे आशावाद निर्माण झाला आहे. गुंतवणुकीतील वाढ, एफडीआयच्या नियमांमध्ये बदल व विविध क्षेत्रांतील नवी प्रशासकीय धोरणे यामुळे नोकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे.

नियुक्तीबद्दलचे चित्र स्पष्ट करण्यासाठी या अहवालामध्ये १९ क्षेत्रांतील व १४ भौगोलिक ठिकाणातील कार्यात्मक व पर्यावरणविषयक पैलूंचे विश्लेषण करण्यात आले आहे. एम्प्लॉयमेंट आउटलूक ट्रेंडचे मूल्यमापन करण्यासाठी भारतातील ७७५ एंटरप्रायजेसचे व जगभरातील ८५ एम्प्लॉयरचे सर्वेक्षण करण्यात आले. यात सर्वेक्षण केलेल्या ११ पैकी नऊ क्षेत्रांमध्ये नेट एम्प्लॉयमेंट आउटलूकमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, आठ क्षेत्रांसाठी आउटलूकमध्ये घट झाली; तसेच, भौगोलिक बाबतीतही नेट एम्प्लॉयमेंट आउटलूक सकारात्मक आहे. टिअर-टू ठिकाणे सकारात्मक एम्प्लॉयमेंट आउटलूकमध्ये मोठे योगदान देत आहेत. या ठिकाणी नियुक्त्यांमध्ये पाच टक्के वाढ झाली, त्यानंतर टिअर-थ्री शहरे व ग्रामीण भाग यांचा समावेश असून, तेथे नियुक्त्यांमध्ये प्रत्येकी दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

सकारात्मकता केवळ क्षेत्रे व भौगोलिक ठिकाणे यापुरती मर्यादित नसून, वरिष्ठ स्तर वगळता सर्व पदांमध्ये दिसून येत आहे. मध्यम स्तरासाठीचा आउटलूक चार टक्के वाढला व एंट्री व ज्युनिअर स्तरासाठीचा आउटलूक प्रत्येकी तीन टक्क्यांनी वाढला. विविध आकाराच्या व्यवसायांसाठी नियुक्तीविषयक स्थितीचे विश्लेषण करत, मध्यम आकाराच्या व्यवसायांमध्ये नियुक्त्यांमध्ये पाच टक्के वाढ होईल, असा अंदाज अहवालात वर्तवला आहे. मोठ्या व लहान कंपन्यांही अनुक्रमे दोन टक्के व एक टक्का वाढ नोंदवतील, असा अंदाज आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search