Next
गोदरेज इंटेरिओतर्फे ‘मोशन चेअर’ हे खास उत्पादन
प्रेस रिलीज
Thursday, March 29, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this story

इंटेरिओ विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर
पुणे : ‘गोदरेज इंटेरिओ’  भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँडने  ‘मोशन चेअर’ हे विशेष उत्पादन दाखल केले आहे. इंटेरिओ विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांच्या हस्ते उत्पादनाचे अनावरण करण्यात आले.

‘या नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या मदतीने या रिटेल ब्रँडचे पुण्यामध्ये आरोग्य व वेलनेस श्रेणीला चालना देण्याचे व त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट आहे.’ इंटेरिओ डिव्हिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘दशक किंवा त्याहून अधिक काळाशी तुलना करता, आजकाल कामासाठी ऑफिसमध्ये अधिक तास घालवले जातात. कामाच्या ठिकाणी बराच वेळ बसून काम करत असताना, ऑफिसला जाणाऱ्यांना बराच वेळ अतिशय अवघडलेल्या स्थितीत बसावे लागते व म्हणूनच अशा व्यक्तींसाठी हे उत्पादन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.’

‘आरोग्य व वेलनेस उत्पादनांची लोकप्रियता वाढत असल्याने आधुनिक ऑफिस फर्निचरसाठी मागणी वाढली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संधी असल्याने आम्ही आरोग्य व वेलनेस श्रेणीतील फर्निचरच्या उत्पादनामध्ये वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले. गोदरेज इंटेरिओचा एकूण संघटित ऑफिस फर्निचर उद्योगामध्ये सोळा टक्के हिस्सा असून, एकूण उत्पन्नात पुण्यासह पश्चिम बाजाराचे २६ टक्के योगदान आहे. सध्या, महाराष्ट्रातील ऑफिस फर्निचर क्षेत्राचे ब्रँडच्या एकंदर ऑफिस फर्निचर उद्योगाच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये योगदान सात टक्के  आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘आमच्यासाठी पुणे ही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इतक्या उत्तम व वाढत्या बाजारात नवे उत्पादन दाखल करण्यास आमची पसंती असते. तसेच, पुण्यातील ऑफिस फर्निचर श्रेणीमध्ये लक्षणीय व परिवर्तनशील ट्रेंड दिसून येत आहेत. ऑफिस फर्निचर या संकल्पनेचा कल सौंदर्याकडून ह्युमन इंजिनीअरिंगकडे वळला आहे आणि पुण्यातील जाणकार ग्राहकांना हे परिवर्तन पसंत पडले आहे’, असेही माथूर यांनी नमूद केले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link