Next
निकलस मॉन्सरॅट
BOI
Thursday, March 22, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘सेलर्स विथ देअर बिल्ट इन सेन्स ऑफ ऑर्डर, सर्व्हिस अॅन्ड डिसिप्लीन, शुड बी रनिंग द वर्ल्ड!’ म्हणणाऱ्या निकलस मॉन्सरॅटचा २२ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणीमध्ये त्याचा अल्प परिचय...
..........
२२ मार्च १९१० रोजी लिव्हरपूलला जन्मलेला निकलस मॉन्सरॅट हा कादंबरीकार आणि खलाशी म्हणून प्रसिद्ध होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने ब्रिटीश आरमारामध्ये काम केलं होतं. त्याला दर्यावर्दी जीवनाचं विशेष आकर्षण होतं. जे त्याच्या लेखनातून जाणवतं. 

‘धिस इज द स्कूलरूम’ ही त्याची पहिली कादंबरी विशेष गाजली नाही, मात्र पुढे त्याने सागरी पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ‘एच.एम. कॉर्व्हेट’ आणि‘द क्रुएल सी’या कादंबऱ्या गाजल्या.
 
‘द क्रुएल सी’ आणि 'एच. एम. एस. मार्लबरो विल एन्टर हार्बर’ या कादंबऱ्या तुफान लोकप्रिय झाल्या होत्या. ‘द क्रुएल सी’वर सिनेमाही बनला होता.

त्याला जगभर प्रसिद्धी देणाऱ्या त्याच्या दोन कादंबऱ्या होत्या -‘द ट्राईब दॅट लॉस्ट इट्स हेड’ आणि ‘रिचर दॅन ऑल हिज ट्राईब’! 

अॅट फर्स्ट साईट, द व्हिपिंग बॉय, द व्हिजिटर, लिव्ह कॅन्सल्ड, एच.एम.फ्रीगेट, अ फेअर डे'ज वर्क, द टाईम बिफोर धिस, द व्हाईट राजा, द नायलॉन पायरेट्स, द शिप दॅट डाईड ऑफ शेम, स्मिथ अॅन्ड जोन्स, समथिंग टू हाईड - असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. द मास्टर मरिनर ही त्याची भव्य कादंबरी त्याच्या मरणोत्तर प्रकाशित झाली.

८ ऑगस्ट १९७९ रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link