Next
‘वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे’
वृक्ष लागवड कार्यक्रम नियोजन आढावा बैठकीचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, May 29, 2019 | 12:37 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे पुणे विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या.

३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम नियोजन आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पुणे व कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनुक्रमे विवेक खांडेकर व क्लेमेंट बेन, पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त अजित पवार, अधीक्षक कृषी अधिकारी विनय आवटे, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी आदी उपस्थित होते.


डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पुणे विभागाचे पाच कोटी एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने काम पूर्ण करावे. जमिनीची माहिती, प्रत्यक्ष खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची माहिती वेळेत सादर करावी. वृक्ष लागवडीबाबतची माहितीपुस्तिका वेळेत तयार करावी.’ 

बैठकीत विभागनिहाय खोदलेल्या खड्ड्यांची संख्या, रोपांची लागवड, हरित सेना नोंदणी आदी बाबींचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी घेतला. या वेळी पुणे विभागातील वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, जलसंपदा, सहकार, उद्योग, रेशीम, महिला व बालविकास आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search