Next
अॅटलास कॉप्कोचे नवीन कॉम्प्रेसर
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 01:02 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर’च्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या ‘अॅटलास कॉप्को’ या कंपनीने, ‘एक्सआरएक्स १३५०’ हा नवीन कॉम्प्रेसर बाजारात आणला आहे. कमी विजेचा वापर करत, उच्च दाबाने जमिनीखालील खोल विहिरीतील पाण्यापर्यंत पोहोचण्याचे तंत्रज्ञान या कॉम्प्रेसरमध्ये आहे.
 
एक्सआरएक्स १३५० हे विहीर कॉम्प्रेसर आकाराने छोटे आहेत; मात्र त्यामधील तंत्रज्ञानामुळे जमिनीखालील खोदकाम अधिक चांगल्या प्रकारे केले जाते. देशभरातील काही भाग खडकाळ असून, तिथे खोदकाम करणे कठीण जाते. मात्र एक्सआरएक्स १३५० या कॉम्प्रेसरमधील दुहेरी दाब तंत्रामुळे (३६५-४२५ पीएसआय) जमिनीखालील पाण्यापर्यंत पोहोचण्याचे खोदकाम अन्य कॉम्प्रेसरच्या तुलनेत वेगाने होते. 

या कॉम्प्रेसरची आणखी काही वैशिष्ट्ये म्हणजे, त्यांची उच्च कार्यक्षमता आणि अष्टपैलुत्व. या कॉम्प्रेसरमध्ये असलेल्या फीचर्समुळे त्याची कामगिरी उंचावली आहे.
 
अॅटलास कॉप्को इंडिया लिमिटेडच्या ‘पॉवर टेक्निक कस्टमर सेंटर’चे महाव्यवस्थापक नितीन लाल म्हणाले, ‘अॅटलास कॉप्कोच्या कॉम्प्रेसर व्यवसायामध्ये, विहीर हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशभरातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे, तसेच जमिनीखालील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे जमिनीखाली गेलेले पाणी वर आणण्यासाठी बोअरवेल खोदणाऱ्या, उच्च तंत्रज्ञान असलेल्या यंत्रांची सध्या आवश्यकता आहे. आमच्याकडे अशाप्रकारे खोलवर खोदकाम करणारी उच्च क्षमतेची, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रे-उपकरणे आहेत. ग्राहकांच्या गरजा ओळखून, जमिनीखालील खोदकामासाठी लागणारे श्रम कमी करून, चांगला परिणाम  देणाऱ्या जागतिक दर्जाच्या यंत्रनिर्मितीकडे आमचा कल आहे.’
 
अॅटलास कॉप्कोने आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविध यंत्रांचा समावेश केला आहे. भारतामधील जमिनी व वातावरणाचा अभ्यास करून, या यंत्रांची रचना करण्यात आली आहे. अॅटलास कॉप्को ही संशोधन आणि विकास या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी आहे. त्यामुळेच ग्राहकांचे समाधान होईल अशा यंत्रांची निर्मिती करण्यासाठी, या कंपनीचा सतत प्रयत्न सुरू असतो.
 
अॅटलास कॉप्कोचा अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला प्रकल्प चाकण येथे आहे. या प्रकल्पाच्या छतावर सौरउर्जेसाठीचे तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. या प्रकल्पामधून तयार होणाऱ्या सौरउर्जेद्वारेच वीजनिर्मिती केली जाते. त्यापैकी ८० टक्के ऊर्जा ही अक्षय आहे. या तंत्रामुळे हा प्रकल्प पर्यावरणपूरक बनला असून, दरवर्षी बाहेर पडणाऱ्या सहाशे टन एवढ्या कार्बन डाय ऑक्साइड वायूचे उत्सर्जन थांबले आहे.
 
अॅटलास कॉप्कोची देशभरात २२ कार्यालये असून, त्यामध्ये तीन हजार कामगार कार्यरत आहेत. या कंपनीचा महसूल तीन हजार पाचशे कोटींपेक्षा अधिक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link