Next
युवा प्रताप पुरस्काराचे वितरण
प्रेस रिलीज
Wednesday, February 07 | 06:31 PM
15 0 0
Share this story

पुणे : कृषी पदवीधर संघटनेचे युवा प्रताप पुरस्कार जाहीर झाले असून, ११ फेब्रुवारी २०१८ ला या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

पुरस्कारचे वितरण शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, आमदार बच्चू कडू, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘शेकाप’चे चिटणीस प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस-पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘प्रगतीशील शेतकरी, उद्योजक, कृषी संशोधक, कृषी शिक्षक, महिला सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यकर्ते, कृषीविषयात वार्तांकन करणारे पत्रकार अशा ४८ व्यक्ती आणि संस्थांना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. इस्त्रायल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याच्या कृषी क्षेत्राला कसे पुढे नेता येईल आणि शेतीतील नैराश्य दूर करण्यासाठी काय करता येईल, याबाबत या सोहळ्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती महेश कडूस यांनी दिली.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : रविवार, ११ फेब्रुवारी २०१८
वेळ : दुपारी ३.३० वाजता
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ghanshyam Hemade About 340 Days ago
माननीय श्री .महेश कुडूस साहेबांनी शेती क्षेत्रात उत्तम काम कारणाऱ्या प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक व विविध कृषी क्षेत्रातील वेक्तीना सन्मानित करण्यात येते व त्यांना प्रोत्साहित करण्यात येते त्या बद्दल महेश कुडूस साहेबांचे खूप आभार .
0
0

Select Language
Share Link