Next
रूबी हॉल क्लिनिकतर्फे ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती कार्यक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, October 31 | 05:02 PM
15 0 0
Share this story

रूबी हॉल क्लिनिकतर्फे आयोजित ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संजय देशमुख, मकरंद टिल्लू, डॉ. भूषण झाडे, शुभदा क्रुझ आदी मान्यवर.

पुणे : महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी रूबी हॉल क्लिनिकतर्फे ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मकरंद टिल्लू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रूबी हॉल क्लिनिकचे सर्जिकल आँकोलॉजीचे संचालक डॉ. संजय देशमुख, रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ. भूषण झाडे व रूबी हॉल कॅन्सर सेंटरच्या असिस्टंट जनरल मॅनेजर शुभदा क्रुझ उपस्थित होत्या. 

डॉ. संजय देशमुख व डॉ. भूषण झाडे यांनी लवकर निदान, उपचार तसेच आहार याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला ५० पेक्षा अधिक ब्रेस्ट कॅन्सरमधून बचावलेल्या महिला उपस्थित होत्या. या महिलांकरिता ‘खेळ पैठणी’चा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तेहमी ग्रँट नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जनजागृती निर्माण करणारी नाटिका सादर केली.   

मकरंद टिल्लू
मकरंद टिल्लू यांनी ‘आर्ट ऑफ लाफींग’ या विषयावर विशेष व्याख्यान दिले. या व्याख्यानादरम्यान त्यांनी उपस्थितांकडून लाफ्टर योगामधील व्यायामाचे प्रकार करून घेतले व निरोगी जीवनासाठी लाफ्टर योगाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले,   ‘लोक फक्त एकमेकांना सकारात्मक विचार करायला सांगतात;पण तो सकारात्मक विचार कसा करायचा हे सांगत नाहीत. सकारात्मक विचारांसाठी हसणे हा सर्वोत्तम उपाय आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link