Next
‘रुबी’मध्ये महिलेवर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
प्रेस रिलीज
Friday, December 21, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपुणे : गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत वेदना होत असलेल्या एका ५९ वर्षीय महिलेवर रुबी हॉल क्लिनिकमध्ये रोबोटच्या साहाय्याने पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

गेले सहा महिने त्या उलट्या, भूक न लागणे या त्रासाने ग्रस्त होत्या. या संदर्भात त्यांनी रुबी हॉल क्लिनिकचे जनरल सर्जन डॉ. प्रमोद कदम यांची भेट घेतली. अनेक चाचण्यांनंतर त्यांना पित्ताशयामध्ये खडे झाल्याचे निदान झाले आणि त्यामुळे त्यांच्यावर रोबोटिक कॉलेसिस्टेक्टॉमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चरबी व पित्ताच्या अन्य घटकांपासून तयार झालेले छोटे खडे म्हणजे गॉलस्टोन्स होय. भारतातील सुमारे १० लाख लोक या समस्येने ग्रस्त आहेत. दरवर्षी एक लाख नवीन लोकांमध्ये गॉलब्लॅडरचे निदान होते. आपल्या एका जागी बसून राहण्याची जीवनशैलीबरोबरच साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यामुळे यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.  छातीच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होणे आणि ह्या वेदना पुढे खांदा पाठीच्या वरील भागापर्यंत पसरणे, तसेच पोटात ढवळणे, उलट्या होणे, सतत ढेकर येणे, गॅसेसचा त्रास ही या रोगाची काही लक्षणे आहेत. दा विंसी रोबोटिक सर्जिकल प्रणालीचा वापर करून रुबी हॉल क्लिनिकने कमीत कमी छेद असलेली शस्त्रक्रिया नव्या पातळीवर नेली आहे.

या प्रसंगी बोलताना रुबी हॉल क्लिनिकचे रोबोटिक सर्जन, डॉ. कदम म्हणाले, ‘जेव्हा रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा बर्‍याच महिन्यांपासून अधूनमधून त्यांना वेदना होत होत्या. त्यांना या त्रासापासून लवकर सुटका मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना रोबोटिक कॉलेसिस्टेक्टॉमी या शस्त्रक्रियेबद्दल सुचवले. रोबोटिक सहाय्याने व कमीत कमी छेद असणार्‍या शस्त्रक्रियांमध्ये कमीत कमी रक्तस्त्राव व जखमा होतात. प्रणालीमध्ये रुग्णाच्या शरीररचनेचे त्रिमितीय व उच्च दर्जाचे चित्र दिसते आणि त्यामुळे आम्हाला अचुकतेने काम करता येते.’

शस्त्रक्रिया झालेल्या रुग्ण म्हणाल्या, ‘सारख्या होणार्‍या उलट्या व मळमळ यामुळे माझ्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. वेदना कशामुळे होत आहेत हे मला समजत नव्हते. फक्त दोनच दिवसांत या वेदनाच दूर झाल्या नाहीत, तर आता मला चालतादेखील येत आहे आणि त्यासाठी डॉ. कदम आणि हॉस्पिटलमधील त्यांच्या संपूर्ण टीमची आभारी आहे, ज्यांनी माझी एवढी काळजी घेतली.’

याप्रसंगी बोलताना ‘रुबी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘रोबोटिकची ही शस्त्रक्रिया म्हणजे आमच्या टीमची उत्कृष्ट सेवा व अचूकता देण्यासाठी असलेली कटिबद्धता दर्शविते. आमच्या येथे असलेले शल्यविशारद व तज्ञांच्या समर्पित सेवेमुळे होणारी लक्षणीय प्रगती शक्य झाली आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search