Next
‘मराठी भाषा सर्वांना समान वागवणारी’
प्रेस रिलीज
Tuesday, January 16, 2018 | 02:51 PM
15 0 0
Share this article:

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी बोलताना इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरेपुणे : ‘भाषा-भाषांमध्ये फरक करू नये. मराठी भाषा सर्वांना समान वागवणारी भाषा आहे. मराठी भाषेचा विकास केला पाहिजे, वाढ केली पाहिजे. एमसीई सोसायटीच्या स्पोकन इंग्लिश अॅकॅडमीच्या या कार्यक्रमाने मराठी भाषेला चांगला प्रतिसाद दिला आहे’, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम आझम कँपसमधील डॉ. ए. आर. शेख असेंब्ली हॉलमध्ये झाला.

या वेळी अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्ससचे संचालक प्रा. डॉ आर गणेसन, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख उपस्थित होते. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मराठी भाषा पंधरवड्यातील आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले .

‘मराठी भाषेच्या अभिवृद्धीमध्ये मुस्लिम बांधवानी फार मोठे योगदान दिले असल्याचे डॉ. मोरे यांनी नमूद केले.

आझम कँपस आणि शहरभर हे कार्यक्रम झाले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये काव्य वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटक स्पर्धा, मराठी चित्रपट शो, महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, मराठी लेखक आणि कवी भित्तिपत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 121 Days ago
How come . It's use is going down.
0
0

Select Language
Share Link
 
Search