Next
पुण्यात मोफत कृत्रिम पायरोपण शिबिराचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, January 02, 2019 | 05:32 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना मान्यवर.

पुणे : ‘दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी टू यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट), पोलिओ कॅलिपर्स, सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा वाटप शिबिर  आयोजित केले आहे. पाच व सहा जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी सहा या वेळेत महावीर प्रतिष्ठान येथे हे शिबिर होणार असून, ते पूर्णतः मोफत आहे,’ अशी माहिती जयपूर फूटचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दीपक सेठिया यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी लायन राजेंद्र गोयल, लायन श्याम खंडेलवाल, लायन वीरेंद्र पटेल, सुनील पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सेठिया म्हणाले, ‘लायन हसमुख मेहता यांनी जयपूर फूट शिबिराची सुरुवात केली. पुण्यात शनिवार व रविवार या दोन दिवशी होत असलेले हे ५१ वे शिबिर आहे. आजवर जवळपास सात ते आठ हजार लोकांना जयपूर फूटचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅलिपर्स, सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा शेकडोच्या संख्यने वाटण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, नाशिक, कोपरगाव, संगमनेर या ठिकाणी हे शिबिर घेतले जाते. एका शिबिरात साधारणतः ६००-७०० लोकांना लाभ होतो.’

वीरेंद्र पटेल म्हणाले, ‘पुण्यासह तीन व चार जानेवारीला पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात हे शिबिर होईल. त्याचबरोबर फाटलेले किंवा विद्रुप असलेल्या ओठ, कान व नाकावर मोफत शल्यचिकित्सा शिबिर महावीर प्रतिष्ठान येथे त्याच दोन दिवशी होणार आहे.’

बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय आयोजकांतर्फे केली जाणार आहे.

शिबिराविषयी :
दिवस :
पाच व सहा जानेवारी २०१९
वेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी सहा
स्थळ : महावीर प्रतिष्ठान, महर्षीनगर पोलीस चौकीजवळ, सॅलिसबरी पार्क, पुणे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : सुरेश पटेल- ९४२२० ८५६६४, संध्या दहिवळकर- ९८८१३ ३२४८०
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link