Next
‘टायकॉन पुणे २०१८’ उपक्रमाचा शुभारंभ
प्रेस रिलीज
Monday, April 16, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this story

‘टायकॉन पुणे’ उपक्रमाची माहिती देताना,(डावीकडून) विश्वास महाजन, रवी निगम, किरण देशपांडे व मंदार जोशी

पुणे : ‘टायकॉन पुणे २०१८ या उद्योजकता परिषदेचे येत्या  २० आणि २१ एप्रिल रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले असून,  त्यामध्ये एफ. सी. कोहली, एस. रामादोराई, अॅलेक पद्मसी व इतर अनेक ख्यातनाम वक्ते मार्गदर्शन करणार आहेत’, अशी माहिती ‘टाय पुणे’चे अध्यक्ष किरण देशपांडे यांनी येथे दिली.

‘टायकॉन ही शहरातील सर्वांत मोठी उद्योजकता परिषद असून, स्टार्ट अप्स आणि उगवत्या कंपन्यांना वित्तपुरवठ्यासाठी आणि त्यांच्या मोठ्या उपक्रमासाठी ती मदत करते. तिच्या ‘नर्चर मेंटरिंग’ उपक्रमाअंतर्गत १४ कंपन्यांची यशस्वी वाटचाल झाली आहे’, असेही देशपांडे यांनी सांगितले.

 ‘टाय चार्टर मेंबर्सकडून नवीन कंपन्यांना नऊ ते बारा महिन्यांच्या कालावधीत रचनात्मक प्रशिक्षण दिले जाते.  त्यामुळे अनेक नर्चर कंपन्यांचा अत्यंत वेगाने विकास झाला असून, त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवत आहेत. नर्चर अॅट टाय पुणेमधून एकाच छताखाली इन्क्युबेटर आणि अॅक्सेलेरेटरचे सर्वोत्तम घटक एकत्र आणले जातात.  आता विद्यार्थी समुदायासाठीही नर्चर मेंटरिंग कार्यक्रम आणण्याचीही योजना आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले, ‘अनेक वर्षांपूर्वी अँजेल इन्व्हेस्टमेंट उपक्रमाचा अभ्यास करत असताना मूलभूत मूल्यनिर्मिती करण्यासाठी आपण संस्थापकांसोबत जवळून काम केले पाहिजे आणि स्टार्टअपसाठी आराखडा तयार केला पाहिजे हे स्पष्ट झाले. एक मेंटॉर, हा एका मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकासारखा असतो जो गरज असताना आसपास असतो परंतु अदृश्य असतो. ‘टाय पुणे’ आता हा उपक्रम जगभरातील इतर टाय शाखांमध्येही सुरू करणार आहे.
 
नर्चर अॅट टाय पुणेचे अध्यक्ष आणि टेस्टी बाइट इटेबल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवी निगम म्हणाले, ‘नवीन युगाच्या मोठ्या प्रमाणावरील कंपन्यांचे प्रशिक्षण करत असताना आमची सर्वांत मोठी प्रेरणा ही बिझनेसच्या संस्थापकांना त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानापेक्षा त्यांच्यामध्ये जास्त काहीतरी आहे आणि नेतृत्व आणि धोरण हे स्वतंत्र करता येणार नाही यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार करण्याची होती.या स्टार्टअप विविध पार्श्वभूमीवरून आल्या आहेत. बिग डेटा मॅनेजमेंट, फिनटेक, इ-कॉमर्स, क्विक सर्व्हिस रेस्तराँ (क्यूएसआर), शाश्वतता आणि नूतनक्षम ऊर्जा आणि इतर अनेक भविष्याधारित बिझनेस मॉडेल्स यात आहेत. या वेळी सादरीकरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये सेरुलियन एन्विरो टेक, माय नालंदा सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस, इएमसेवा, पिक्सेलिमेज, गिगइंडिया, रोनिन वाइन्स, ग्रीन सॅल्यूट, सँपल ट्रंक, हँडिब्रो, सेपाल, मार्केटयार्ड अॅग्री सोल्यूशन्स, दि मुस्टॅच लाँड्री, मासवेर ऑटोमोटिव्ह यांचा समावेश होता. या वेळी पोर्टलँड येथील एलिव्हेट कॅपिटल कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक नितीन राय यांनी मार्गदर्शन  केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link