Next
‘टेक्सझोन’तर्फे ‘एचजीएच इंडिया’चे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, May 26, 2018 | 04:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : होम टेक्स्टाईल, होम डेकॉर, गिफ्टस व हाउस वेअरचे भारतातील सर्वांत मोठे ट्रेड फेअर असलेल्या ‘एचजीएच इंडिया २०१८’चे आयोजन तीन ते पाच जुलै या कालावधीत येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, उत्पादक व वितरण भागीदार एकाच व्यासपीठावर एकत्र येतील.

उत्पादन श्रेणीमध्ये होम टेक्स्टाईल, फर्निशिंग फॅब्रिक्स आणि वॉलपेपर्स, ब्लाईंडस, रग्स, फ्लोअर कव्हरिंग्स, फ्रॅगरन्सेस, स्पा उत्पादने, हँडीक्राफ्ट्स यांसारखी होम डेकॉर उत्पादने तसेच कुक वेअर, टेबल वेअर, किचन वेअर, किचन अप्लायंसेस, क्लिनिंग, हेल्थ अ‍ॅंड हायजीन, स्टोरेज व आउटडोअर प्रॉडक्ट्स यांसारखे हाउसवेअर प्रॉडक्ट्स आणि नाविन्यपूर्ण भेटवस्तूंचा समावेश आहे. लोकप्रिय, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ब्रँड्ससह आणि हँडमेड व मशिनमेड मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील अभिनवतेसह ‘एचजीएच इंडिया’ सज्ज आहे. या प्रदर्शनात ३०हून अधिक देशातील ५५० हून अधिक कंपन्या सहभागी होत आहेत.

२०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘एचजीएच इंडिया’मध्ये भारतभरातून ४६२ शहरांमधून रिटेलर्स, डिस्ट्रिब्युटर्स व इन्स्टिट्युशनल बायर्ससह या क्षेत्रातील ३० हजार ७०० हून अधिक व्यावसायिकांनी भेट दिली होती. व्यावसायिक खरेदीदार आपल्या वार्षिक गरजांसाठी, तसेच नवीन व्यावसायिक संधींसाठी आणि २०-२५ टक्के प्रतिवर्ष वाढत असलेल्या होम कॅटेगरीमधील नवीन कल समजण्यासाठी येतात. ‘एचजीएच इंडिया २०१८’मध्ये नेहमीच्या सहभागाव्यतिरिक्त चीन, टर्की व तैवान यांची दालने तसेच ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, युके, युएसए व कॅनडा येथील कंपन्या देखील सहभागी होत आहेत.

‘एचजीएच इंडिया’ गेल्या काही वर्षांप्रमाणेच यावर्षीही भारतीय बाजारपेठेसाठी २०१८-१९मधील फॅशन ट्रेंड्सचा अंदाज वर्तवतील. एचजीएच ट्रेंड एरियामध्ये खास तरुणवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन होम प्रॉडक्ट ट्रेंडस प्रदर्शित केले जातील; तसेच एचजीएच ट्रेंड बुक देखील येथे उपलब्ध असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link