Next
‘ना जातीवर, ना धर्मावर, मतदान करा कार्यावर!’
BOI
Saturday, October 05, 2019 | 05:06 PM
15 1 0
Share this article:सोलापूर :
‘ना जातीवर ना धर्मावर... मतदान करा कार्यावर... !’ असा संदेश रोपळे (ता. पंढरपूर) येथील शाळकरी मुलांनी दिला. रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृतीसाठी गावातून रॅली काढली होती. जाती-पातीवर मतदान न करता उमेदवाराचे कार्य पाहून मतदान करण्याचे आवाहन मुलांनी केले. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले होते. आता विधानसभा निवडणुकीवेळीही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोपळे बुद्रुक येथील पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बिभीषण पाटील व पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. 

‘शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा, मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा, निर्भय होऊन मतदान करा, जागरूक नागरिक होऊ या, अभिमानाने मतदान करू या,’ अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 12 Days ago
Yes . That is what matters in life . For instance , a famine affects all , -- no matter what matter you are . A capability is what matters -- religion of the person is not the most important matter .
0
0
श्री पाटील बी.यू.मुख्याध्यापक About 13 Days ago
आपल्या। या बातमीमुळे महाराष्ट्रातील अनेक लोकांवर परिणाम होवुन चांगल्या दर्जाचे लोक निवडुन येतील.
0
0

Select Language
Share Link
 
Search