Next
‘रोल्स रॉइस’तर्फे नवी ‘कलिनन’ सादर
प्रेस रिलीज
Monday, May 14 | 12:10 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : सुपर लक्झरी जीवनशैलीमध्ये बदल घडत असून, ‘रोल्स-रॉइस’ त्यात अग्रस्थानी आहे. लक्झरी ही आतात शहरी संकल्पना राहिलेली नाही. आपली क्षितिजे विस्तारून व्यापक अनुभवांचा अनुभव घेणे ही सध्याची लक्झरीची संकल्पना आहे. ग्राहकांनाही अत्यंत आलिशानपणे, विनासायास आणि कोणतीही तडजोड न करता आयुष्यातील प्रत्येक अनुभव घेण्यासाठी ‘रोल्स रॉइस’तर्फे नवी ‘कलिनन’ सादर करण्यात आली आहे.

‘ही कार अतुलनीय असून, सुपर-लक्झरी प्रवासाचे सर्व निकष या गाडीत सामावलेले आहेत. त्यामुळे ‘रोल्स रॉइस’ची ‘विनासायास’ (एफर्टलेस) ही भावमूल्ये या  कारच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरल्याने ‘कलिनन’ने संपूर्ण जगालाच आपल्या आवाक्यात घेतले आहे,’ असे ‘रोल्स रॉइस मोटर कार्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटव्होस) टॉर्स्टन मुलर यांनी सांगितले.

‘रोल्स रॉइस’ने तीन वर्षांपूर्वी कलिनन‘’ सादर करण्याबाबत घोषणा केली तेव्हा एसयूव्ही बाजारपेठेत लक्झरी, परफॉरमन्स आणि उपयुक्ततेच्या बाबतीत या आधी कधीही न पाहिलेली आणि जगभरातील ग्राहकांनी तयार करण्यास सांगितलेली ‘एसयूव्हींची रोल्स रॉइस’ विचारात घेतली होती. या ग्राहकांपैकी बहुतेक ग्राहक तरुण, यशस्वी, प्रचंड नेट वर्थ (संपत्ती) असलेल्या व्यक्ती होत्या. या व्यक्ती अनुभवात्मक अर्थव्यवस्थेमध्ये (एक्स्पिरिअन्स इकोनॉमी) मोठ्या प्रमाणावर गुंतलेल्या आहेत. त्यांना अशी रोल्स रॉइस हवी आहे, जी कोठेही परिपूर्ण लक्झरीने घेऊन जाईल.

‘रोल्स रॉइस’ने प्रयत्नपूर्वक आपली प्रतिमा घडविली आहे. १९०७ साली ब्रिटिश व्यावसायिक फ्रँक नॉर्बरी यांनी रोल्स रॉइस भारताला परिचित करून दिली. त्या वेळी त्यांनी ‘सिल्व्हर घोस्ट’ने मुंबई ते कोल्हापूर हा घाट-वळणांचा ६२० मैलांचा खडबडीत रस्ता कोणतीही अनुचित घटना वा गाडीमध्ये कोणताही बिघाड न होता पार केला होता. त्यानंतर भारतभरातील महाराजे आणि महाराण्यांकडून रोल्स रॉइसकडे मागणीचा ओघ प्रचंड वाढला. त्यांनी आपल्या रोल्स रॉइस गाड्या विविध प्रकारचे भूभाग असलेल्या या देशांतील जंगलांमधून प्रवास करण्यासाठी वापरण्यात आल्या.

‘कलिनन’विषयी :
‘रोल्स रॉइस कलिनन’ हे यापूर्वी कधीही न पाहिलेला रोल्स रॉइसचा नवा अवतार आहे. ‘एसयूव्ही बाजारपेठेत जी वैशिष्ट्ये उपलब्ध होत नाही, अशी असामान्य वैशिष्ट्ये असलेली गाडी आम्हाला सादर करायची आहे, हे आम्हाला माहीत होते’, असे मुलर-ऑटव्होस यांनी सांगितले. आपल्या जगण्यामध्ये कोणत्याही प्रकारची मर्यादा किंवा तडजोड मुलर यांना मान्य नाही. ते नवे उद्गाते आहेत आणि त्यांना आयुष्यातील प्रत्येक अनुभव हा साहसपूर्ण आणि धाडसी असावा असे वाटते. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा प्रकारचा असेल, तर त्यांना गाडीही अशीच हवी, जी त्यांनी सर्वोत्तम लक्झरी देते आणि शैलीदारपणे म्हणजेच रोल्स रॉइसच्या शैलीत प्रत्येक ठिकाणी घेऊन जाईल. म्हणूनच ‘कलिलन’ची निर्मिती करण्यात आली आहे.

तरुण आणि साहसी ग्राहकांना चाकोरीबाहेरच्या रस्त्यांवर घेऊन जाणारी आणि अत्यंत समृद्ध करणारे अनुभव बहाल करणारी रोल्स रॉइस हवी होती. ‘कलिनन’मध्ये विशुद्ध रूपातील लक्झरी आणि परिपूर्ण व्यवहार्यता व ऑफ-रोड क्षमतेची सांगड घालण्यात आली आहे’, अशी प्रतिक्रिया मुलर-ऑटव्होस यांनी दिली. ‘एफर्टलेस, एव्हरीव्हेअर (विनासायास, कुठेही) हे कलिननचे केवळ वचनच नाही, तर ती वस्तुस्थिती आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

लक्झरी ही एफर्टलेस, एव्हरीव्हेअर मिळावी हे अधिकृत रोल्स रॉइस एसयूव्ही करण्यात झालेले ‘रोल्स रॉइस’च्या दृष्टिकोनातील परिवर्तन आहे. त्याचे अगदी दर्शनीय लक्षण म्हणजे ‘कलिनन’चा क्रांतिकारी पार्श्वभाग. ‘रोल्स रॉइस’मध्ये प्रथमच मागील बाजूने उघडणारे दरवाजे देण्यात आले. त्याला ‘क्लास्प’ असे म्हणतात. सध्याच्या काळात सामान कारच्या टपावर चढविले जाते. प्रवाशांचा हा कल लक्षात घेत ‘कलिनन’ची मागची बाजू दोन भागांत ‘डी बॅक’ प्रकारात विभागण्यात आली आहे. यापैकी सामान ठेवण्याचा भाग राखीव आहे. चावीवरील एक बटन दाबल्यावर क्लास्प दोन भागात आपोआप उघडते आणि बंद होते.

मालकाच्या निश्चित गरजांनुसार कारमधील सर्वात आरामदायी आसने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘कलिनन’च्या मागील बाजूच्या कम्पार्टमेंटमची रचना करण्यात आली आहे. लाउंज सीटचे कॉन्फिगरेशन दोन पर्यायांसाठी अधिक उपयुक्त आहे. मागील बाजूस तिघांसाठी आसनव्यवस्था असल्यामुळे कुटुंबांना या गाडीचे अधिक आकर्षण असेल. मागील बाजूच्या आसनांची घडी पडू शकते. ‘रोल्स रॉइस’मध्ये प्रथमच अशी रचना करण्यात आली आहे.

बूट (आसनाच्या मागील बाजूस असलेले) किंवा डोअर (दरवाजामधील) पॉकेटमधील योग्य बटण दाबून ही सीट विविध कॉन्फिगरेशनमध्ये पुढे किंवा मागे जाते. एकदा बटण दाबल्यावर अत्यंत सहजतेने सीट वाकते, त्याच वेळी हेडरेस्ट वरील बाजूस सरकते जेणेकरून सीट कुशनवर कसलाही ठसा उमटू नये. दोन्ही सीट बॅक्स पूर्णपणे फोल्ड (घडी) होऊ शकतात. त्यामुळे सामान ठेवण्यासाठी सलग जागा उपलब्ध होते आणि कार २/३ व १/३ अशी विभागली जाते. त्यामुळे या गाडीची व्यवहार्यता अजून वाढते. त्यामुळे मागील बाजूस बसलेले प्रवासी भरपूर सामान घेऊन प्रवास करू शकतात किंवा मागील बाजूस असलेली कार्पेटेड सीट बॅकचा वैयक्तिक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठीही उपयोग केला जाऊ शकतो.

ज्यांना आपल्या साहससफरीमधून मोठ्या आकाराच्या वस्तू वाहून आणायच्या आहेत, त्यांच्यासाठी कलिननच्या मागील बाजूस विविध प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link