Next
दाभाड केंद्रात स्वच्छ भारत पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम
मिलिंद जाधव
Saturday, September 15, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this storyभिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील दाभाड शैक्षणिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळांनी एक ते १५ सप्टेंबर या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला. शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांनी शाळेचा परिसर, रस्ते आणि गावाचा परिसर स्वच्छ करून ‘स्वच्छता हीच सेवा’ संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.शाळांमध्ये चित्रकला, कविता, गीतगायन, भाषण, रांगोळी आदींच्या स्पर्धा, प्रभातफेरी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १२ शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळून गावागावांमध्ये धूम्रपान न करण्याविषयी जनजागृती केली.

शाळांनी स्वच्छ शाळा प्रदर्शनही आयोजित केले होते. केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक अश्विनी गावित, कविता भोये, मनीषा धनगर, भाई पाटील, स्वाती तळकर, राजेंद्र भोईर, सुधीर पाटील, यशवंत म्हस्कर, संजय गोसावी, भगवान पाटील, मंदार गोसावी, सोनकवडे, उदय पाटील, अशोक ठाणगे यांनी मेहनत घेऊन घेतली. दाभाड शैक्षणिक केंद्राचे प्रमुख श्यामसुंदर दोंदे यांनी सर्वांचे कौतुक करून आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashwini Deoram Gawit About 161 Days ago
Thank you for printing this important news about our Dabhad cluster and our schools. Also I m greatful towards you to encourage us for this initiative took upon by us.
0
0

Select Language
Share Link