Next
पुणे कँटोन्मेंच्या मागण्यांसंदर्भात खासदार शिरोळेंचा पाठपुरावा
संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रित समितीसमोर मांडल्या मागण्या
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this storyपुणे : पुणे आणि खडकी कँटोन्मेंट विभागाचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रित समितीसमोर मागण्या मांडल्या आहेत.
 
या वेळी केंद्रित समितीचे अध्यक्ष व माजी महसूल सचिव सुमित बोस, सदस्य टी. के. विश्वनाथन, लेफ्टनंट जनरल अमित शर्मा, जयंत सिन्हा, देविका रघुवंशी, माधुमिता रॉय, राकेश मित्तल, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री कृष्णा राज उपस्थित होत्या.

या विषयी अधिक माहिती देताना खासदार शिरोळे म्हणाले, ‘कँटोन्मेंट विभागाचे अनेक प्रश्न आहेत. यामध्ये वाढीव एफएसआय व कर प्रणाली, जीएसटी, या भागाचा विकास, नव्या लीज पॉलिसीची अंमलबजावणी यांसारखे नागरिकांचे प्रश्न लक्षात घेत मी देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्याशी याआधी या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी चार मे २०१८ रोजी देशभरातील ६२ कँटोन्मेंट बोर्डांच्या समस्यांबाबत बैठक घेतली व संरक्षण मंत्रालयाने माजी महसूल सचिव सुमीत बोस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीची स्थापना केली.’

‘या समितीसमोर मी कँटोन्मेंट विभागाला भासत असलेले प्रश्न मांडले. कँटोन्मेंट बोर्ड हे शहराबाहेर स्थलांतरीत करण्याची सूचनाही या बैठकीमध्ये माझ्याकडून देण्यात आलेली आहे व तसा पत्रव्यवहारसुद्धा यापूर्वी केलेला आहे. कँटोन्मेंटसंबंधित प्रश्न यानंतर मार्गी लागतील, अशी मला आशा आहे,’ असे खासदार शिरोळे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link