Next
‘सर्जिकल स्ट्राइकबाबत दोन वर्षांनंतरही सकारात्मक प्रतिक्रिया’
लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांचे मत
BOI
Monday, October 01, 2018 | 05:22 PM
15 0 0
Share this article:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे स्वागत करताना प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी. या वेळी विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुणे :  ‘भारत वेळ पडल्यास सीमापार जाऊन विजयी चढाई करू शकतो, असा इशारा सर्जिकल स्ट्राइक करून भारताने पाकिस्तानला दिला. याला दोन वर्ष झाल्यावरही भारतीय सेना दलाच्या या कारवाईवर देशभरातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत’, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी तीन महत्त्वपूर्ण पदविका अभ्यासक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विभागप्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते. 

निंभोरकर म्हणाले, ‘मुळातच पाकिस्तानने भारताची प्रतिमा ही फक्त बचावाची भूमिका घेणारा देश अशी केली होती. पण सडेतोड उत्तर वेळप्रसंगी देण्याची भारतीय सैन्याची तयारी असते हाच संदेश या मधून देण्यात आला. अशा कारवाईसारख्या अनेक गोष्टी सातत्याने सीमाभागात सुरू असतात. म्यानमारचे सर्जिकल स्ट्राइक झाल्यावर भारताने पाकिस्तानला म्यानमार समजू नये अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केलेली दिसते. त्यामुळे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केल्याची घटना जाहीर करणे गरजेचे होते. भारत चढाई करण्याची रणनीती यशस्वीपणे वापरू शकते हे सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून भारताने स्पष्ट केले.’
 
‘संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाने नव्याने सुरू केलेल्या अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठ स्तरावर माहिती घेऊन पुढील विशेष अभ्यासक्रमाच्या माध्यमातून असे विविध विषय समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे हे महत्त्वाचे आहे’, असेही निंभोरकर यांनी नमूद केले.

प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, ‘विद्यापीठात वेगळ्या विषयांवरील अभ्यासक्रम सुरू करताना नेहमीच चालू काळात विद्यार्थ्यांना या आधारे काम करण्याची संधी मिळावी असा विचार असतो. भारतीय सेना दलाची प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात आदराची आहे. सर्जिकल स्ट्राइक केल्याचे जाहीर झाल्यावर सैनिकांच्या विषयी आदरभाव दुणावला असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केल्या गेल्या. सेना दल आणि राजकीय स्तरावर निर्णयक्षमता हा महत्त्वाचा भाग आहे. योग्य वेळेपर्यंत माहिती गुपित ठेवून, कारवाई पूर्ण झाल्यावर त्याची माहिती देशभरात देण्याच्या निर्णयही तसाच महत्त्वाचा होता.’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने एक वर्ष कालावधीचे तीन महत्त्वपूर्ण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट अँड नॅशनल सिक्युरिटी, डिप्लोमा इन काउंटर टेररिजम स्टडीज आणि डिप्लोमा इन डिफेन्स अॅनालिसिस अँड नॅशनल सिक्युरिटी अशा तीन अभ्यासक्रमांची सुरुवात आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषण राष्ट्रीय केंद्र (YC-NISDA) येथे करण्यात आली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search