Next
महिंद्राची नवी स्कॉर्पिओ दाखल
प्रेस रिलीज
Thursday, November 16 | 04:41 PM
15 0 0
Share this story

नवीन स्कॉर्पिओचे अनावरण करताना कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे विक्री आणि विपणन विभाग प्रमुख विजय नाकरा
पुणे : भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (एम अँड एम लि.) आज या आपली लोकप्रिय एसयूव्ही ‘स्कॉर्पिओ’ची नवी आवृत्ती दाखल केली. नव्या स्कॉर्पिओमध्ये नवीन ६ स्पीड ट्रान्समिशन, जास्त ताकद, खास स्टायलिंग आणि आलिशान आरामदायीपणा देण्यात आला आहे. या गाडीची किंमत नऊ लाख ६९ हजार रुपये (एक्स शोरुम पुणे, एस 3 प्रकाराकरीता) आहे. 

नवी, ताकदवान स्कॉर्पिओ एस थ्री, एस फाइव्ह, एससेव्हन (१२० बीएचबी), एससेव्हन (१४० बीएचपी), एस११ (१४०बीएचपी) आणि एस११ (१४० बीएचपी ४ डब्ल्यूडीसह) अशा सहा प्रकारांत असून ती देशभरातील महिंद्राच्या सर्व  वितरकांकडे उपलब्ध आहे. 

या नवीन स्कॉर्पिओचे अनावरण कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे विक्री आणि विपणन विभाग प्रमुख विजय नाकरा यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘२००२ मध्ये दाखल  झाल्यापासून स्कॉर्पिओने महिंद्रासाठी नवे मापदंड निर्माण केले. सहा लाख ग्राहकांसाठी स्कॉर्पिओ अभिमानाचा विषय बनताना पाहाणे विलक्षण आहे.  आता  नवी, ताकदवान स्कॉर्पिओ दाखल करत असून तिच्याद्वारे गाडीची मूळ साहसी संरचना कायम ठेवत रस्त्यावरील तिची कामगिरी आणखी उंचवायची आहे. ग्राहकांना ही नवी ताकदवान स्कॉर्पिओ थरारक व साहसपूर्ण प्रवासासाठी योग्य समीकरण वाटेल अशी आमची खात्री आहे’.
 
ते पुढे म्हणाले, ‘नव्या स्कॉर्पिओत एमहॉक इंजिन बसवण्यात आले असून ते १४० बीएचपीची जास्त ताकद आणि ३२० एनएमचा जास्त टॉर्क देण्यासाठी बनवण्यात आले आहे. याचा सुधारित लो- एंड टॉर्क गाडी शहरात चालवण्याचा आनंद देतो आणि मुबलक मिड- रेंज टॉर्क महामार्गावर चालवण्याचा आनंद देतो. संपूर्णपणे नवे, सोपे, ६ स्पीड ट्रान्समिशन कामगिरी सुधारते व त्यामुळे महामार्गावर जास्त सहज गाडी चालवून इंधनाची बचत करणे शक्य होते. फॉक्स लेदरमुळे अंतर्गत सजावट जास्त स्टायलिश व उच्चभ्रू दिसते. याची ९.१ बॉश एबीएस यंत्रणेसह सुधारित ब्रेकिंग यंत्रणा, जास्त वेगवान आणि सुधारीत अनुभव देते.  रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, नवा वन टच लेन चेंज इंडिकेटर, ऑटो विंडो रोल- अप, स्टॅटिक बेंडिंग तंत्रज्ञान असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, जीपीएससह सहा इंची टच- स्क्रीन इन्फोटेनमेंट, गाडीतील हवामानावर नियंत्रण करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा अशी अनेक आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये यात समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये ड्युएल एयरबॅग्ज, अँटी- लॉकिंग यंत्रणा (एबीएस), कोलॅप्सिबल स्टिअरिंग कॉलम आणि साइड इन्ट्रुजन बीम्स, पॅनिक ब्रेक्स इंडिकेशन, इंजिन मोबिलायजर्स इत्यादीं उच्च प्रतीची सुरक्षा वैशिष्ट्येही आहेत’.

‘सात, आठ आणि नऊ अशा तीन  आसनक्षमतांमध्ये ही गाडी उपलब्ध असून रंगामध्ये  नवा पर्ल व्हाइट (फक्त एस ११ मध्ये) उपब्ध आहे. तर, डायमंड व्हाइट (एस ११ खेरीज सर्व प्रकारात उपलब्ध असून, नेपोली ब्लऍक, डी सॅट सिल्व्हर, मोल्टेन रेड हे रंग सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link