Next
‘कॉम्पिटेटिव्ह प्लेअर अॅप’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, September 10, 2018 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

पुणे : रीडर्स क्लब एज्युकेशन ग्रुपच्या महाराष्ट्र अॅकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटेटिव्ह प्लेअर अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपचे उद्घाटन १२ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील व पुणे शहर पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंग उपस्थित राहणार आहेत.

या वेळी कृष्णप्रकाश ‘अभ्यास, आरोग्य आणि प्रशासनातील आरोग्य’, संदीप पाटील ‘पोलीस क्षेत्रातील संधी आणि बदलते पोलिसिंग’, तर ज्योती प्रिया सिंग ‘महिला सबलीकरण व प्रशासनातील महिलांना आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

‘या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्नावली सोडविता येणार आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी १० सेकंदाचा वेळ दिला जाईल. १० सेकंदात उत्तर देणाऱ्याला पेटीएममार्फत रिवार्ड्स मिळतील. अशा स्वरूपात विद्यार्थी या अॅपमधील प्रश्नोत्तरांची मजाही लुटतील व अनेक नवीन गोष्टी सहज शिकू शकतील,’ असे कार्यक्रमाचे आयोजक पंकज तोष्णीवाल यांनी सांगितले.

उद्घाटनाविषयी :
दिवस :
बुधवार, १२ सप्टेंबर २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search