Next
‘टाटा स्काय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ची भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 03:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘टाटा स्काय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ यांनी धोरणात्मक भागीदारी स्वीकारली आहे. भारतात करण्यात आलेल्या या भागीदारीमुळे, येत्या काही महिन्यांत, ‘टाटा स्काय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ अशा दोन्हींच्या सबस्क्रिप्शनमुळे ‘टाटा स्काय’च्या व्यासपीठावरून जागतिक स्तरावरील संहिता आपल्यासाठी सुलभपणे उपलब्ध होणार आहे.

‘टाटा स्काय’च्या सबस्क्राइबर्सना ‘नेटफ्लिक्सची संपूर्ण सेवा, टीव्हीवरील कार्यक्रम, सिनेमे, माहितीपट, स्टँड अप कॉमेडी आणि लहान मुलांसाठीचे कार्यक्रम अशा सर्वच संहिता अगदी सहजपणे ब्राउज करता येणार आहेत. ‘नेटफ्लिक्स’ सेवेत हजार तासांपेक्षा अधिक अल्ट्रा एचडी संहिता समाविष्ट आहे, ‘टाटा स्काय’च्या विस्तारीत उत्तम दर्जाच्या कार्यक्रमांसाठी हे पूरकच आहे.

या नव्या भागीदारीविषयी टाटा स्काय लिमिटेडचे एमडी आणि सीईओ हरीत नागपाल म्हणाले की, ‘आमच्या सबस्क्राइबरसाठी आम्ही त्यांच्या मागणीनुसार जागतिक स्तरावरील संहिता सादर करतो, आमच्या या सेवेमध्ये नेटफ्लिक्सबरोबरच्या भागीदारीमुळे भरच पडणार आहे. सर्वप्रथम नावीन्यपूर्ण सेवा देण्याचे आमचे वचनही राखले जाणार आहे. या भागीदारीमुळे अन्य कुठल्या सेवा दिल्या जातील, हे आम्ही लवकरच जाहीर करू. आमच्या कुटुंबात नेटफ्लिक्सचा समावेश झाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे, आमच्या सर्व सबस्क्राइबरना यापुढेही एक्स्ट्राऑर्डिनरी करमणुकीचा अनुभव देण्याकडे आमचे लक्ष राहील.’

‘नेटफ्लिक्स’च्या व्यवसाय विकासाचे जागतिक स्तरावरील प्रमुख बिल होम्स म्हणाले की, ‘छत्राखाली उत्तम संहिता देता यावी, यासाठी टाटा स्कायबरोबर भागीदारी केल्याचा आम्हाला आनंदच आहे. ‘नेटफ्लिक्स’बरोबरच्या या नव्या भागीदारीमुळे आणि त्यांच्या जगभरातील मूळ संहितांमुळे, ‘टाटा स्काय’च्या ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्वोत्तम करमणुकीचा आनंद अमर्यादितपणे घेता येणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link