Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात खंडेलवाल यांचे व्याख्यान
प्रेस रिलीज
Thursday, August 09, 2018 | 12:52 PM
15 0 0
Share this storyऔंध : पुणे येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अभियंता गोविंद खंडेलवाल यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी ‘आयटी क्षेत्रातील नव्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदशन केले.

ते म्हणाले, ‘आज विज्ञान- तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्याला आयटी क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. आपण एखाद्या गोष्टीचे कौशल्य आत्मसात केल्यानंतरही कंपनी आपणास पुन्हा ट्रेनिंग देते. कारण प्रायव्हेट सेक्टर आणि कार्पोरेट सेक्टर यामध्ये खूपच फरक आहे. कार्पोरेट सेक्टरमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपले चालणे बोलणे वागणे हे स्मार्ट असावे लागते. वेळेच्याबाबतीत आपण जागरूक असणे गरजेचे असते.’

आयटी क्षेत्रात प्रवेश करताना आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी याबाबतही खंडेलवाल यांनी सखोल मार्गदर्शन केले.

प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले.

या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले करिअर निवडता यावे, इंटरव्ह्यूची तयारी करता यावी, प्रायव्हेट सेक्टर आणि कार्पोरेट सेक्टर यातील साम्यभेद कळावा, सॉफ्टवेअर टेस्टिंगमधील नव्या संधी कळाव्यात, या हेतूने या कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटी विभागाचे प्रमुख प्रा. मयूर माळी यांनी केले. प्रा. गौरी पवार यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. विशाल शिशुपाल उपस्थित होते. आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link