Next
‘महाबँके’तर्फे डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
प्रेस रिलीज
Wednesday, April 18, 2018 | 03:32 PM
15 0 0
Share this article:



पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंती निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्रने वर्ष २०१७-१८साठी एससी-एसटी कर्जदारांना कर्ज वितरण आणि वसूली या संदर्भात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शाखांना पुरस्कार प्रदान केले. विजेत्या शाखांना पद्मश्री प्राध्यापक सुखदेव थोरात आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, तसेच सीईओ आर. पी. मराठे यांच्या हस्ते वार्षिक रोलिंग ट्रॉफी प्रदान केली गेली.

या वेळी बोलताना मराठे म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या या शुभ आणि प्रेरणादायक क्षणी विजेत्या शाखांना सन्मानित करताना अत्यंत आनंद होत आहे. आमची बँक देशातील आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक सुदृढतेसाठी वचनबद्ध आहे आणि अशा प्रकारची कृती आमच्या शाखांना प्रोत्साहित करते, जेणेकरून ते समाजातील त्या वर्गाची आर्थिक मदत करतील जे की आजही दुर्बल आहेत.’

पद्मश्री प्राध्यापक डॉ. सुखदेव थोरात म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर एक सच्चे राष्ट्रभक्त होते आणि त्यांनी देशात न की केवळ सामाजिक, परंतु आर्थिक सुधारणांचा प्रयत्न केला. त्यांनी आजच्या आर्थिक प्रणालीचा पाया रचला. देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी बँकिंग एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे, मागास व्यक्तींना अर्थ सहाय्य उपलब्ध करून देणे प्रत्येक बँकेची जबाबदारी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सामाजिक कर्ज देण्याच्या योजनांमध्ये कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी पाऊले उचलत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे.’

बँकेने आपल्या विविध अंचल कार्यालयांमध्ये देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search