Next
पुण्यातील जागतिक भाषावारीत मराठीने केले नेतृत्व
सहा हजार भाषांचे वैभव आणि वारकरी संस्कृतीचा गजर
BOI
Saturday, September 29, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पेन इंटरनॅशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात जागतिक भाषावारी आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून, भाषावारीची सुरुवात करण्यात आली. त्यात विविध संलग्न महाविद्यालयांतील तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, तसेच शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते.

या वेळी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांच्यासहित पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर, अध्यक्षा जेनिफर क्लेमंट, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी जगभरातील सहा हजार भाषांचे फलक हाती घेऊन वारीमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे प्रत्येक भाषेचे चार पद्धतीने होणारे उच्चार अथवा भाषेची ओळख या फलकांवर देण्यात आली होती. मराठी भाषेने या वारीचे नेतृत्व केले. विविध पारंपरिक दिंड्यांनी सहभाग घेऊन मराठी मौखिक परंपरेतील संतजनांचे अखंड नामस्मरण, अभंग गायन करून, मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले. 

ही भाषावारी विद्यापीठातून सेनापती बापट मार्ग, सिम्बायोसिस भवन, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, तुकाराम पादुका चौक, घोले रस्ता या मार्गावरून बालगंधर्व रंगमंदिरापाशी आली. 

(जागतिक भाषावारीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link