Next
‘बजाज अॅलियान्झ’तर्फे ‘टोटल हेल्थ सिक्युअर गोल’ योजना सादर
प्रेस रिलीज
Monday, April 29, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:

‘बजाज अॅलियान्झ जनरल इन्शुरन्स’ या खासगी जनरल इन्शुरन्स कंपनीने आणि ‘बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स’ या खासगी लाइफ इन्शुरन्स कंपनीने एकत्रितपणे ‘बजाज अॅलियान्झ टोटल हेल्थ सिक्युअर गोल’ हे पहिले एकत्रित उत्पादन दाखल केले आहे. ही विमा योजना एकाच सर्वंकष विमा योजनेद्वारे ग्राहकांच्या आरोग्य व जीवनातील उद्दिष्ट्ये या गरजा पूर्ण करेल, अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे. 

‘बजाज अॅलियान्झ टोटल हेल्थ सिक्युअर गोल’ या प्लानमध्ये बजाज अॅलियान्झ जनरल इन्शुरन्सचा हेल्थ गार्ड आणि बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्सचा बजाज अॅलियान्झ आयसिक्युअर या सध्याच्या दोन योजनांची सांगड घालण्यात आली आहे. हा कॉम्बि प्लान ग्राहकांना एकूण देय प्रीमिअमवर पाच टक्के अतिरिक्त डिस्काउंट देतो. 

या विषयी माहिती देताना ‘बजाज अॅलियान्झ जनरल इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघल म्हणाले, ‘सुरक्षित जीवनासाठी व स्वाभिमानाने जगण्यासाठी योग्य आरोग्य विमा योजना व टर्म इन्शुरन्स प्लान खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. कोणतीही वैद्यकीय समस्या उद्भवल्यास, आरोग्य विमा योजनेमुळे आर्थिक सुरक्षितता मिळते, तर योजनाधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास योजनाधारकाच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांची काळजी टर्म इन्शुरन्स प्लान घेतो. हे विचारात घेऊन, आम्ही ग्राहकांना सर्वंकष विमा योजना उपलब्ध करण्याच्या हेतूने, बजाज अॅलियान्झ टोटल हेल्थ सिक्युअर गोल दाखल करण्यासाठी बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्सशी सहयोग केला.’ 

‘बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले, ‘दोन आवश्यक विमा उत्पादने एकाच उत्पादनामध्ये समाविष्ट करणे, ही यामागील संकल्पना आहे. प्रत्येकाने आरोग्य विमा व हेल्थ कव्हर घेणे आवश्यक आहे आणि सवलतीचा दर उपलब्ध करून ग्राहकांना त्यांच्या आरोग्यसेवेच्या खर्चाची तरतूद टप्प्याटप्प्याने करण्यासाठी आणि काही अनियोजित घडल्यास ग्राहकांच्या जीवनातील उद्दिष्ट्यांमध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून त्यांच्या जीवनातील उद्दिष्टांना संरक्षण देण्यासाठी उत्तेजन मिळेल, अशी अपेक्षा आहे. जीवन व आरोग्य याविषयीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एकच कवच घेण्यास पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी हे कॉम्बि उत्पादन आदर्श पर्याय देणार आहे.’

हे कॉम्बि उत्पादन ग्राहकांसाठी सर्व माध्यमांतून उपलब्ध होईल. हेल्थ गार्ड योजनेअंतर्गत, ग्राहकांना सिल्व्हर किंवा गोल्ड प्लान घेता येऊ शकतो व त्याची सम इन्शुअर्ड १.५ लाख रुपये ते ५० लाख रुपये असेल, तर ग्राहकांना येणारा हॉस्पिटलायझेशन खर्च त्याद्वारे केला जाईल. बजाज अॅलियान्झ आयसिक्युअर ग्राहकांना कमी खर्चात लेव्हल टर्म कव्हरचा फायदा देते. धूम्रपान न करणाऱ्यांसाठी विशेष प्रीमिअम आणि उच्च सम अॅश्युअर्ड, हे एक अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. जोडीदाराला कवच देण्यासाठी बजाज अॅलियान्झ आयसिक्युअरमध्ये जिंट लाइफ पर्यायही समाविष्ट आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search