Next
‘अॅक्सिस’बरोबर सामंजस्य कराराचे पुनर्नूतनीकरण
प्रेस रिलीज
Wednesday, April 18, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय सैन्यदलाने अॅक्सिस  बँकेबरोबर झालेल्या सामंजस्य कराराचे पुनर्नूतनीकरण केले असून, त्याअंतर्गत संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘पॉवर सॅल्युट’ या पगार खात्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्याची बांधिलकी जपण्यासाठी बँकेतर्फे संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या गरजांनुसार त्यांना खास सेवा दिली जाणार आहे.

सामंजस्य करारावर सह्या करतेवेळेस भारतीय सैन्य दलाचे लेफ्टनंट जनरल एसके सैनी, एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम, डीजी (एमपी आणि पीएस) तसेच अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि प्रमुख शाखा बँकिंग संजय सिलास आणि बँकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी सिलास म्हणाले, ‘भारतीय सैन्य दलासाठी उपयुक्त सेवा पुरवताना अॅक्सिस बँकेला अभिमान वाटत असून यापुढेही संरक्षण दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खास तयार करण्यात आलेल्या बँकिंग सेवा आम्ही देत राहू.’

महत्त्वाच्या बँकिंग सेवांखेरीज बँकेद्वारे शून्य बाकी, संयुक्त खाते, ३० लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात संरक्षण, ३० लाख रुपयांपर्यंतचे अंशतः किंवा संपूर्ण अपंगत्व संरक्षण, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपयांचा शैक्षणिक फायदा (संरक्षण कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास) आणि गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क सेवा दिल्या जातील. या सामंजस्य कराराअंतर्गत संरक्षण दलाचे कर्मचारी तसेच पेन्शनर्सनाही सेवा मिळणार आहे.

संरक्षण दलासाठी बँकेने १८०० ४१९८ ००७ हा टोलमुक्त मोफत हेल्पलाइन क्रमांक लाँच केला आहे.

‘अॅक्सिस बँके’बद्दल :
अॅक्सिस बँक ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. बँकेद्वारे मोठे व मध्यम कॉर्पोरेट्स, एसएमई, शेती व रिटेल व्यवसाय अशा विविध प्रकारच्या ग्राहकांना सर्व सेवा पुरवल्या जातात.

तीन हजार ५८९ देशांतर्गत शाखा (विस्तारित काउंटर्ससह) आणि १३ हजार ९७७ एटीएम्ससह ३१ डिसेंबर २०१७ रोजी अॅक्सिस बँकेचे नेटवर्क एक हजार ९४६ शहरे व गावांत पसरलेले असून, त्यामुळे विस्तारित उत्पादन श्रेणी व सेवांसह मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणे बँकेला शक्य झाले आहे. बँकेची परदेशात नऊ कार्यालये असून, सिंगापूर, हाँगकाँग, दुबई (डीआयएफसी), शांघाय आणि कोलंबो येथे शाखा, तर दुबई, अबू धाबी आणि ढाका येथे शाखा कार्यालये आणि लंडन, युके इथे परदेशी उपकंपनी आहे.

अधिक माहितीसाठी :
www.axisbank.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link