Next
‘ऐसी अक्षरे’तर्फे कलावंतांच्या साहित्यावर विशेषांकाचे प्रकाशन
BOI
Wednesday, September 25, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this article:

बेलवलकर हाऊसिंगचे संचालक समीर बेलवलकर व ऐसी अक्षरेचे संपादक पद्मनाभ हिंगे

पुणे : ‘बेलवलकर हाउसिंगच्या ‘ऐसी अक्षरे’ या नियतकालिकातर्फे नाट्य व चित्रपट सृष्टीतील कलावंतांच्या साहित्यावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन शनिवार, २८ सप्टेंबर २०१९ रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ऐसी अक्षरे शब्द रूपेरी असे या कार्यक्रमाचे नाव असून, ज्येष्ठ साहित्यिक व लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे,’ अशी माहिती बेलवलकर हाउसिंगचे संचालक अजित बेलवलकर व समीर बेलवलकर, तसेच ऐसी अक्षरेचे संपादक पद्मनाभ हिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘पडद्यावरील व पडद्यामागचे कलावंत आपले अनुभव व या क्षेत्रातील प्रवास कुठे ना कुठेतरी सांगत असतात किंवा लिहूनही ठेवतात. त्यातल्या या कलावंतांच्या प्रतिभेतून, मनातून, अनुभवातून प्रवासातून कागदावर उमटलेली अक्षरे रसिक वाचकांपर्यंत पोहोचावीत या हेतूने या ‘ऐसी अक्षरे’च्या सोळाव्या वर्षपूर्ति निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या विशेषांकात घेतली आहेत. यामध्ये मधुकर तोरडमल, डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, विजया मेहता, मोहन जोशी, डॉ. गिरीश ओक, गुरू ठाकूर, नीना कुलकर्णी, प्रणित कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता सुभाष, ऋषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रविण तरडे, मिलिंद शिंत्रे आदी कलावंतांचे लेख आहेत,’ असेही बेलवलकर यांनी सांगितले.

‘कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निवेदन, गायन व दृकश्राव्य चित्रफितीतून उलगडत जाणारा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री मधुरा वेलणकर व सूत्रसंचालक राजेश दामले हे निवेदन करतील. या कार्यक्रमाची संहिता सतीश जकातदार यांची असून, प्राजक्ता रानडे, अमृता नातू, राहुल जोशी, सचिन इंगळे यांच्या गायनाचा रसिकांना आस्वाद घेता येईल. हा कार्यक्रम विनामूल्य असून, याच्या प्रवेशिका बेलवलकर हाउसिंगच्या कार्यालयात २५ सप्टेंबरपासून कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. कार्यक्रमाची विनामूल्य प्रवेशिका बेलवलकर हाउसिंगच्या एरंडवणे येथील निर्मिती एमिनन्स बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावरील कार्यालयात बुधवार आणि गुरूवारी सकाळी ११ ते सायंकाळी सहापर्यंत मिळू शकेल,’ असेही बेलवलकर यांनी सांगितले.

बेलवलकर हाउसिंगतर्फे गेली सोळा वर्षे जुन्या मराठी साहित्यावर आधारित ‘ऐसी अक्षरे’ या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात येते. तरुण पिढीपर्यंत दर्जेदार मराठी साहित्य पोहोचावे व त्यांना मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून तीन हजार प्रती विनामूल्य वितरीत केल्या जातात. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nandkishor Lele About 23 Days ago
फारच महान कार्य करतात बेलवळकर मंडळी सलाम हा अंक आणि मागील अंक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून द्यावेत ही विनंती
0
0
प्रदीप पाटील About 23 Days ago
सुंदर उपक्रम. कार्यक्रमाला यायला आवडेल
0
0

Select Language
Share Link
 
Search