Next
‘अश्रू ईशान्येचे...’ पुस्तकाचे ६ डिसेंबरला प्रकाशन
BOI
Monday, December 04 | 03:19 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडताना मणिपूरमध्ये केलेल्या कामाचे धगधगते वर्णन करणाऱ्या  ‘अश्रू ईशान्येचे... मिशन मणिपूर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ध्येयवेडे वीरपुरुष (कै.) शंकर दिनकर तथा भैयाजी काणे यांनी आपले राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करण्यासाठी ईशान्य भारत निवडला. त्यावेळी त्यांनी आपला वारसा सोपवण्याच्यादृष्टीने जुवाठी गावातील (ता. राजापूर) जयवंत कोंडविलकर या १२ वर्षांच्या मुलाला सोबत नेले. देशाच्या अशांत भूभागाला मनाने, संस्काराने आणि एकात्मतेने जोडणाऱ्या या कामाचे वर्णन ‘अश्रू ईशान्येचे... मिशन मणिपूर’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. या वेळी विद्वान व्याख्यात्यांकडून ‘ईशान्य भारत’ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीचे आवाहन पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

प्रकाशनाविषयी :
दिवस : सहा डिसेंबर २०१७
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क :
विश्वनाथ वासुदेव बापट : ९४०४३ २९३६३, ७७२०० ३९२८९
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link