Next
रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला प्रारंभ
BOI
Thursday, January 04 | 12:04 AM
15 0 0
Share this story

फोटो : आदित्य करंबेळकररत्नागिरी : राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनसंध्या महोत्सवाला तीन जानेवारीपासून रत्नागिरी शहरातील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे दिमाखात प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.

या वेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, ‘मथुरा एक्झिक्युटिव्ह’चे शांताराम देव, ‘कीर्तनसंध्या’चे अध्यक्ष अवधूत जोशी, सामाजिक कार्यकर्ते माधव कुलकर्णी उपस्थित होते. अवधूत जोशी यांनी आफळेबुवांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

सात जानेवारीपर्यंत चालणार असलेल्या या महोत्सवात आफळेबुवा १८५७पासून १९२०पर्यंतचा ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहेत. दररोज सायंकाळी सहा ते रात्री १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. पाचही दिवस कीर्तनाच्या पूर्वरंगात आफळेबुवा लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन करणार आहेत. त्यानंतर उत्तररंगात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्याचा आलेख ते मांडणार आहेत.

अजिंक्य पोंक्षे व हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन) यांची साथसंगत बुवांना लाभली. उदयराज सावंत यांनी ध्वनिव्यवस्था केली होती. निवेदन निबंध कानिटकर यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ASHOK MANOHAR DESAI About 343 Days ago
UTTAM UPAKRAM, JANAJAGRUTI IMPORTANT VEPONCE to knowledge about past history Thanks
0
0

Select Language
Share Link