Next
‘सिल्क इंडिया’ प्रदर्शनाचा शुभारंभ
BOI
Saturday, October 28 | 06:32 PM
15 0 0
Share this story

 पुणे : विवाहसमारंभासाठी नाविन्यपूर्ण साड्या, भेटवस्तू खरेदी करायची असेल तर सोनल हॉलमध्ये भरलेल्या ‘सिल्क इंडिया’ प्रदर्शनाला जरूर भेट दया. दरवर्षीप्रमाणे यंदाही वैविध्यपूर्ण पारंपरिक  वस्त्रशैलीतील रेशमी साड्यांचा खजिना खुला झाला आहे. तब्बल दहा दिवस, ५ नोव्हेंबरपर्यंत हा वस्त्रमहोत्सव चालणार असून विवाह समारंभासाठी एकसे बढकर एक साड्या खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

‘हस्तशिल्पी’ संस्थेने देशभरातील हातमाग कारागिरांना एकत्र आणून त्यांच्या अप्रतिम कला कौशल्याचे नमुने येथे सादर केले आहेत. कारागिरच थेट ग्राहकांना विक्री करत असल्याने किंमत आणि दर्जा याची खात्री मिळते. पारंपरिक वस्त्रशैलीतील अनेक प्रकारच्या साड्या तर आहेतच पण ड्रेस मटेरियल्स, तयार कपडेदेखील  उपलब्ध आहेत.    
   ‘ग्राहकांना थेट उत्पादने उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश आहे. विविध रेशीम साडी विणकर, हातमाग क्लस्टर आणि सिल्क को-ऑपरेटिव्ह सोसायट्या यांना एकत्र आणले असल्याने मोठ्या प्रमाणात येथे ग्राहकांना निवडीला वाव मिळतो.’ असे हस्तशिल्पीचे संघटक टी.अभिनंद यांनी सांगितले.

 ‘अरिनी सिल्क, क्रेप व ज़ॉर्जेट, शिफॉन, टसर साडी आणि सूट, कांजीवरम, ज्यूट सिल्क, सिल्क कॉटन, उपाडा, गढवाल, पैठणी, पोचमपल्ली अशा अनेक प्रकारच्या साड्या येथे आहेतच त्याचबरोबर  हॅन्ड  ब्लॉक प्रिंट कपडे , बेड कव्हर्स, डिझायनर ड्रेस मटेरियल्स, कुर्ती, हाताने विणलेले आसाम मुगा फॅब्रिक्स याचेही असंख्य नमुने नजर खिळवून ठेवतात. 
             

‘सिल्क इंडिया प्रदर्शन’
स्थळ : सोनल हॉल, कर्वे रोड
वेळः सकाळी १०.३०  ते रात्री ८.३०
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link