Next
‘सूर्यदत्ता’चे विद्यार्थी करणार आंतराष्ट्रीय हॉटेल्समध्ये इंटर्नशिप
प्रेस रिलीज
Wednesday, December 12, 2018 | 03:39 PM
15 0 0
Share this story

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाअंतर्गत सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या ४१ विद्यार्थ्यांची भारतातील व परदेशातील फाइव्ह स्टार व सेव्हन स्टार हॉटेल्समध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

२०१७ ते २०२० या बॅचमधील विद्यार्थ्यांना भारतासह न्यूझीलंड, सिंगापूर, मॉरिशस, दुबई आदी ठिकाणी नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये पाच महिन्यांच्या इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. मुलाखती आणि पात्रतेचे निकष यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. ६० पैकी ४१ विद्यार्थी रेजेस लेकलँड रिसॉर्ट, रामी ग्रँड, कपथॉर्न, क्वीन्सटाउन, ईआईएच, ग्रँड मर्क्युर, लाँग बीच, शेरेटॉन ग्रँड, सेंसिमर लैगून, डोमेने डी एल ओरेंगेराई, किंग्सगेट, ताज गेटवे या हॉटेल्सचा यामध्ये समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी वर्षभर फील्ड वर्क, लाइव प्रोजेक्ट, वर्कशॉप, फूड फेस्टिवल, होटल, बेकरी, इंडस्ट्रियल किचन यांसारखे उपक्रम राबविले जातात. उद्योग व विविध विषयांतील तज्ज्ञ व्यक्तींकडून व्याख्याने, कार्यशाळा होत असतात. विद्यार्थ्यांनाही स्वतः अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक उपक्रमांतही विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असतो. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग, मेडिटेशन, खेळ, एरोबिक्स आदी उपक्रम होतात.

या वेळी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘हे यश विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग, नियमित उपस्थिती आणि विविध उपक्रम हे या यशात महत्त्वपूर्ण ठरले आहे. आज अनेक विद्यार्थी नामांकित हॉटेल आणि कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत, हे पाहून आनंद वाटतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link