Next
वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत डॉ. म्हैसेकरांच्या हस्ते वृक्षारोपण
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 05:53 PM
15 0 0
Share this article:


पुणे : राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज (एक जुलै) विधानभवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (रोहयो) अजित पवार, नगरप्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर, अधीक्षक कृषी अधिकारी (रोहयो) विनयकुमार आवटी, सहायक वनसंरक्षक संजय मारणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे व मुकेश काकडे यांनीही वृक्षारोपण केले. या वेळी महसूल, वन व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पुणे विभागाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पाच कोटी एक लाख १० हजार असून, विभागात पाच कोटी ५७ लाख ६३ हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यामध्ये ग्रामपंचायत आणि वन विभागाचा महत्त्वपूर्ण वाटा असणार आहे. पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात १०० टक्के काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. वारी मार्गावर आणि अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’


श्री लक्ष्मी म्हणाल्या, ‘वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात एक कोटी ५४ लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. यात वन विभाग, सामाजिक वनीकरण या विभागांबरोबरच अन्य विभागांचाही मोलाचा वाटा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, एनसीसीचे विद्यार्थी, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वृक्ष लागवडीची अद्ययावत माहिती वन विभागाच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search