Next
‘आयसीआयसीआय’तर्फे भारतातील पहिला डिजिटल अर्ज
प्रेस रिलीज
Monday, April 23 | 11:23 AM
15 0 0
Share this story

मुंबई : आयसीआयसीआय बँक या एकत्रित मालमत्तेच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने स्मार्टफोन व टॅब्लेटवर डिजिटल अर्ज सुविधा उपलब्ध केल्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींची व व्यवसायांची करंट खाते काही दिवसांऐवजी केवळ काही तासांमध्ये उघडणे शक्य होणार आहे.

या खाते उघडण्याच्या या विशेष डिजिटल अर्जामुळे बँकेच्या ग्राहकांना ग्राहकाच्या संकुलात सोयीच्या व सुरक्षित पद्धतीने ग्राहकाविषयी व व्यवसायाविषयी माहिती आता डिजिटल पद्धतीने घेता येईल व तातडीने ‘केवायसी’ कागदपत्रांची खातरजमा करता येईल. या सुविधेमुळे, ग्राहकांना आता बँकेत वेगाने व सुरळीतपणे खाते उघडण्याची सेवा मिळणार आहे; तसेच त्यासाठी त्यांना स्वतःची व फर्मची ‘केवायसी’ कागदपत्रे, फिजिकल फोटोग्राफ अशी किचकट कागदपत्रे पुरवण्याचे काम करावे लागणार नाही.

ही पहिलीवहिली डिजिटायझेशन प्रक्रिया व्यवसायाची विविध प्रकारची करंट अकाउंट उघडण्यासाठी वापरता येईल. प्रोप्रायटरशिप, भागीदारी, प्रायव्हेट व पब्लिक लिमिटेड कंपन्या आणि लिमिटेड लाएबिलिटी पार्टनरशिप फर्म यासाठी खाते काही तासांत उघडता येऊ शकते.

डिजिटल अर्जाबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानही उपलब्ध आहे, जसे ‘ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकगनिशन’ (ओसीआर), यामुळे कागदपत्रांतील लेखी अक्षरे ओळखली जातात व डिजिटल अर्जामध्ये अचूकपणे व सुरळीतपणे ऑटो-पॉप्युलेट केली जातात. ही सेवा मल्टिपल नाविन्यपूर्ण ‘अॅप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस’चाही (एपीआय) वापर करते. ज्यामुळे व्यक्ती व व्यवसायाच्या केवायसी कागदपत्रांची खातरजमा तातडीने केली जाते व त्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), आधार व इम्पोर्ट-एक्स्पोर्ट कोड (आयईसी) असा सरकारी माहितीची मदत घेतली जाते. डिजिटल अर्जाच्या या सर्व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे बँकेला काही तासांत करंट अकाउंट उघडून ग्राहकांना दिली जाणारी सेवा व सोय अधिक सुधारता येईल.

टेक्नोप्रिन्युअर्सबरोबरच्या सहयोगाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून, बँकेच्या फिनटेकबरोबरच, ‘आयसीआयसीआय’च्या अद्ययावत नाविन्य केंद्रामध्ये ही नाविन्यपूर्ण सुविधा विकसित करण्यात आली आहे.

चंदा कोचरया उपक्रमाविषयी ‘आयसीआयसीआय’च्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी सांगितले, ‘आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना डिजिटल नाविन्य आणण्यासाठी व जागतिक दर्जाचा बँकिंग अनुभव घेण्यासाठी नेहमी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. या उद्देशाला अनुसरून, आम्ही डिजिटल पद्धतीने करंट अकाउंट उघडण्याची देशातील पहिली सुविधा सुरू करत आहोत. या सुविधेमुळे काही तासांत करंट अकाउंट उघडण्याची नवी विशेष सुविधा सुरू होणार असून, अगोदर या सुविधेसाठी काही दिवस लागायचे. बँकिंग पार्टनरचा विचार करत असताना व्यवसाय व कंपन्या ‘व्यवसाय करण्याची सुलभता’ हा मुख्य निकष लक्षात घेतात. या दृष्टीने, बँकिंग वेगाने व सहजपणे करण्याची सुविधा देण्यासाठी आम्ही बिझनेस बँकिंगमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. यामुळे आम्हाला करंट अकाउंट व बिझनेस बँकिंग व्यवसाय या क्षेत्राच्या तुलनेत अधिक वेगाने विस्तारता येईल, तसेच त्यामुळे आमचा बाजारहिस्साही वाढेल.’  

खाते जलद उघडणे, प्रत्यक्षातील कागदपत्रे कमी करणे, अधिक अचूक, कागदाचा कमी वापर हे या अर्जाचे काही फायदे आहेत. सर्व तपशील डिजिटल अर्जामध्ये घेण्यात आला की वन-टाइम ऑथेंटिकेशन म्हणून ग्राहकाने खाते उघडण्याच्या अर्जाचा सारांश आणि महत्त्वाच्या अटी व शर्ती यांवर प्रत्यक्ष सही करणे गरजेचे असते.

बँक बिझनेस-बँकिंग श्रेणीसाठी विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा उपलब्ध करत असताना, करंट अकाउंट उघडण्याची ही डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये, ‘एमएसएमईं’साठी देशातील पहिली ऑनलाइन व इन्स्टंट ओव्हरड्राफ्ट सुविधा, आघाडीच्या सॉफ्टवेअर उत्पादन फर्मच्या मदतीने अकाउंटिंग व बँकिंग सेवा यांचे एकाच ठिकाणी एकात्मिकरण यांचा समावेश आहे.

‘आयसीआयसीआय बँके’विषयी :
आयसीआयसीआय बँक लिमिटेड ही एकत्रित संपत्तीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. ३१ डिसेंबर २०१७पर्यंत बँकेची एकूण एकत्रित संपत्ती १६५ अब्ज डॉलर होती. ‘आयसीआयसीआय’च्या उपकंपन्यांमध्ये भारतातील आघाडीच्या खासगी विमा, संपत्ती व्यवस्थापन व सिक्युरिटीज ब्रोकरेज कंपन्यांचा समावेश आहे आणि देशातील सर्वात मोठ्या खासगी इक्विटी फर्मचा समावेश आहे. बँक भारतासह १७ देशांत कार्यरत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link