Next
रमणबाग प्रशालेत ‘भानाचे भूत’चे नाट्यवाचन
BOI
Wednesday, August 08, 2018 | 01:43 PM
15 0 0
Share this storyपुणे : येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत दर शनिवारी बहुआयामी तासिका सादर केली जाते. यात नाट्य, गायन, वादन, वक्तृत्व, व्याख्याने आदी विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण केली जाते.

नुकत्याच झालेल्या बहुआयामी तासिकेत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या हेतूने प्रशालेच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख, नाट्यकर्मी शिक्षक रवींद्र सातपुते यांनी प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची ‘भानाचे भूत’ ही कथा हृदयस्पर्शी नाट्यवाचनाद्वारे सादर केली. प्रभावी वाचनातून त्यांनी कथेतील अदृश्य पात्रे, त्यांच्या भाव-भावना, व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे विद्यार्थी आणि श्रोत्यांसमोर जिवंत उभे केले.

‘दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशालेत आंतरवर्गीय नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रभावी वाचन कसे असावे याचा वस्तुपाठच आजच्या सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना मिळाला,’ असे गौरवोद्गार प्रशालेच्या शाळाप्रमुख शितलोत्तम रेड्डी यांनी काढले; तसेच नाट्यवाचनास संगीत साज चढवणार्‍या होनराज मावळे, मुकुंद कोंडे व स्वप्नील कुंभार या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या वेळी उपमुख्याध्यापिका जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक श्री. जगताप जाधव यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link