Next
‘टाटा मोटर्स’तर्फे विशेष मॉन्सून ऑफर्स
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 11:31 AM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा मोटर्स या कंपनीतर्फे जुलै २०१८साठी मॉन्सून ऑफर्स जाहीर केल्या आहेत. टिगोर, नॅनो, हेक्झा, सफारी स्ट्रोम आणि झेस्ट या मॉडेल्ससाठी पहिल्या वर्षाचा विमा हप्ता केवळ एक रुपयाला देऊ केला आहे. निवडक मॉडेल्सवर २० ते ३० हजार रुपयांच्या सवलतींचा लाभही ग्राहकांना देऊ केला असून, संभाव्य खरेदीदारांसाठी वर उल्लेखलेल्या मॉडेल्सबरोबरच नेक्सन व टिअॅगोच्या सर्व प्रकारांवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंटही कंपनीने जाहीर केला आहे.

या ऑफर्सबद्दल टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे (पीव्हीबीयू) उपाध्यक्ष (विक्री, मार्केटिंग आणि ग्राहकसेवा) एस. एन. बर्मन म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांसाठी हा पावसाळा अधिक खास व्हावा म्हणून आम्ही या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. आमच्या सर्व ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांना जास्तीत जास्त लाभ पुरवण्याच्या एकमेव उद्देशाने आम्ही या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या उपक्रमामुळे खरेदीदारांचे मनोधैर्य चांगलेच उंचावेल आणि आमच्यासोबत एक ब्रॅंड म्हणून त्यांचा असलेला संबंध अधिक दृढ होईल यावर आमचा ठाम विश्वास आहे.’

‘सध्याच्या अनपेक्षित बदल (टर्नअराउंड) धोरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही चांगली प्रगती केली आहे आणि ग्राहकांच्या निर्णय प्रक्रियेबद्दल जाणून घेत आहोत. कार्यक्षम विक्रीउत्तर सेवा देणे, तक्रारी कमी करणे आणि सर्व ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या मागण्या पूर्ण करणाऱ्या अर्थपूर्ण ऑफर्स देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे बर्मन यांनी सांगितले.

टाटा मोटर्सच्या टर्नअराउंड धोरणाचे निकाल जाहीर झाले असून, कंपनीच्या प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री जून २०१८मध्ये १८ हजार २१३ युनिट्स इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही ६३ टक्के वाढ आहे. आर्थिक वर्ष २०१९च्या पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहनांचा व्यवसाय ५२ टक्के वाढला. यासोबतच कंपनीच्या नेटवर्कमध्येही जोमदार वाढ होऊन ते ४०० आउटलेट्सपासून ७४६ आउटलेट्सपर्यंत पोहोचले आहे. ही संख्या या वर्षाच्या अखेरीपर्यंत ८५०पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.  

कंपनीने दिलेल्या ऑफर्स या कंपनीच्या विक्री वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. यामुळे पुढील महिन्यापासून सुरू होणारा सणासुदीचा काळ व्यवसायाच्या दृष्टीने आक्रमक ठरावा, अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link