Next
‘दुर्बल घटकांसाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवाव्यात’
BOI
Monday, September 10 | 02:33 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकांना मोफत वैद्यकीय सेवा द्याव्या. दाखल होताना रुग्णांकडे आवश्यक कागपत्रे नसल्यास ती मिळविण्यासाठी २४ तासांचा दयावा; तसेच २० टक्के खाटा या घटकातील  रुग्णासाठी आरक्षित ठेवाव्यात,’ अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिल्या.

धर्मादाय रुग्णालय समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांच्या अध्यक्षतेखाली आठ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेश परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंदुरकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बगाडे यांच्यासह धर्मादाय रुग्णालयाचे प्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   

‘निर्धन व दुर्बल घटकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णालयांनी कटिबद्ध असावे. धर्मादाय रुग्णालयाचा फलक दर्शनी भागात लावावा,’ असे तेली यांनी सांगितले.

आयुक्त परदेशी म्हणाले, ‘प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलची तपासणी करून ते रुग्णांना सवलती देतात का ते पहावे, रुग्ण वाढवावेत. हॉस्पिटलमध्ये कमीत कमी २० टक्के खाटा दुबळ घटकातील रुग्णासाठी आरक्षित आसाव्यात. कोणत्याही धर्मादाय हॉस्पिटलला यातून सूट देऊ नये. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी करून ज्या संस्था रुग्णाला लाभ देत नाहीत त्याची माहिती द्यावी.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link