Next
विज्ञान शिक्षकांसाठी झाली कार्यशाळा
BOI
Monday, August 20, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांतील विज्ञान शिक्षकांसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे नुकतेच ‘स्टेप टू दी अॅक्टिव्ह लर्निंग इन केमिस्ट्री’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे एरव्ही विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत रमविणारे विज्ञान शिक्षक स्वतःच विविध वैज्ञानिक खेळ खेळण्यात, कोडी सोडविण्यात, समूहचर्चा करण्यात आणि प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करण्यात रमून गेले होते. 

विद्यालयातील विज्ञानाचे शिक्षण अर्थपूर्ण आणि आनंददायी करण्यासाठी शिक्षकांनी शिकवण्याचे तंत्र बदलण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’तर्फे ‘युसूफ हमीद इन्स्पिरेशनल केमिस्ट्री प्रोग्रॅम’ची आखणी करण्यात आली आहे. नेहमीच्या व्याख्यान पद्धतीपेक्षा छोटे छोटे खेळ, कोडी, समूहचर्चा, प्रात्यक्षिक अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊन शिकवणे शक्य आहे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने भारतातील विविध राज्यांत तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशाळेतील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. याचाच भाग म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. 

‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’तर्फे प्रशिक्षक म्हणून डॉ. विमला ओक यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाला माध्यमिक शिक्षण विभागाने मान्यता दिली होती. जिल्हा शिक्षक विज्ञान मंडळाने हा उपक्रम विज्ञान शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या कार्यशाळेच्या समन्वयाची जबाबदारी निभावली. रत्नागिरी परिसरातील विविध शाळांमधून चाळीस शिक्षक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले. 

(विज्ञान केवळ पुस्तकात न ठेवता आपल्या आयुष्याचा भाग बनवणारे लोक दुर्मीळ असतात. त्यापैकी एक म्हणजे संजय पुजारी. आपल्या विज्ञानवेडातून त्यांनी कराडला डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केलं असून, शाळांतली मुलं तिथे स्वतः प्रयोग करून विज्ञान शिकतात आणि त्यांना विज्ञानाची गोडी लागते. विज्ञानाचा ‘पुजारी’ असलेल्या या तरुणाची नि त्याने उभारलेल्या विज्ञान केंद्राच्या वाटचालीची प्रेरणादायी गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रिया गावडे About 242 Days ago
खूप छान .
0
0

Select Language
Share Link
 
Search