Next
नवी दिल्ली येथे अलायन्स अॅडव्होकेट्स प्रशिक्षण
भारत आणि आशियामध्ये तयार केले सुरक्षित शाळा विभाग
प्रेस रिलीज
Friday, November 30, 2018 | 04:19 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : फेडेक्स कॉर्प.ची उपकंपनी असलेल्या आणि जगातील सर्वात मोठी जलद वाहतूक करणाऱ्या फेडेक्स एक्स्प्रेसने रस्ते सुरक्षेसाठीच्या ग्लोबल अलायन्स फॉर एनजोज या जगभरातील २२० एनजीओंचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनेला नवी दिल्ली येथे पहिला अलायन्स अॅडव्होकेट्स प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत केली आहे.

या प्रशिक्षणामध्ये आशिया खंडाच्या परिसरात असलेल्या आठ देशांमधील २१ एनजीओ प्रमुख सहभागी होणार आहेत. यात भारतातील सात राज्यांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण सुरक्षित शाळा झोन प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. आशियातील अनेक शाळांच्या परिसरात रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे मुलांचा जीव धोक्यात येतो. अलायन्स अॅडव्होकेट्स हे सहभागी आकडेवारीवर आधारित दृष्टिकोन घेऊन नवी दिल्लीतील शाळांच्या परिसरातील रस्त्यांमध्ये सोपे, कमी खर्चातील बदल करणार आहेत. हे बदल केल्यास हे रस्ते आंतरराष्ट्रीय रस्ते सुरक्षा कम्युनिटीने शिफारस केलेल्या किमान दर्जाच्या रस्त्यांसारखे होणार आहेत.

शाळेच्या कार्यपद्धतीसाठी इंटरनॅशनल रोड असेसमेंट प्रोग्रॅमच्या (आयआरएपी) मानांकनांचा उपयोग करून या प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागी रस्त्यांबाबतची आकडेवारी गोळा करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कृती आराखडा नक्की केला जाईल. हा आराखडा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, स्थानिक वाहतूक पोलीस आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या प्रतिनिधींसह सर्व निर्णयकर्त्यांसमोर अॅडव्होकसी योजना सादर करतील. या सुरुवातीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या अलायन्स अॅडव्होकेट्सना भारतातील रस्ते धोरण आणि पायाभूत सुविधा नेते आणि प्रतिनिधींसमोर सादरीकरण करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

भारतातील फेडेक्स एक्स्प्रेसच्या विक्री विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू डेव्हिस म्हणाले, ‘फेडेक्स एक्स्प्रेसतर्फे जगभरात ८५ हजार मोटार वाहने संचालित करण्यात येतात. त्यामुळे आम्ही जिथे राहतो व काम करतो तेथील टीम सदस्यांपलीकडे जाऊन समाजामध्येही रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता वाढविण्याबाबत आमची भूमिका आणि बांधिलकी स्पष्ट आहे आणि रस्ते सुरक्षेसाठी एनजीओंच्या ग्लोबल अलायन्सला सहकार्य करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’

अलायन्सतर्फे करण्यात आलेल्या कामाबद्दल बोलताना कार्यकारी संचालक लोटे ब्रॉन्डम म्हणाल्या, ‘शाळेत जाताना आणि परतताना आशियातील काही भागांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असतो. भारतात ज्या अलायन्स अॅडव्होकेट्सना आम्ही प्रशिक्षित करत आहोत, ते व्यवहार्य आणि परिणामकारक योजना घेऊन जातील, जेणेकरून ते आपले ज्ञान शेअर करू शकतील आणि एकत्रित काम करून आशियातील शाळा अधिक सुरक्षित करतील. फेडेक्सने सढळ हस्ते केलेली मदत आणि बांधिलकी यामुळे अलायन्य सबलीकरण कार्यक्रम शक्य झाला आणि जगभरातील जीव वाचविण्यासाठी एनजीओंना साधनसमृद्ध करत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link