Next
मोहोळ येथे महिला किसान दिन
BOI
Saturday, October 20 | 04:08 PM
15 0 0
Share this story



सोलापूर : मोहोळ कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला किसान दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती समता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रा. दगडू कदम, कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, तालुका समन्वयक राजरत्ना जावळे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या रजनी सरदीकार, अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील सहाय्यक श्री. बारकडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

प्रास्ताविक करताना डॉ. वळकुंडे यांनी महिला किसान दिन आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. ‘महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषी उद्योगात संधी असून, अधिक तंत्र आत्मसात करणे ही सद्यस्थितीची गरज आहे,’ असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात सभापती गावडे यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून महिलांनी कृषी उद्योजक बनण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी तांत्रिक सत्रात काजल जाधव यांनी ‘कोरडवाहू शेती : समस्या व उपाययोजना’ यासंबंधी विशेष मार्गदर्शन केले. डी. एन. क्षीरसागर यांनी ‘परसबागेतील भाजीपाला लागवड’ याविषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी श्री. जोशी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

डी. पी. बरकडे यांनी हुमणी जीवनचक्राची माहिती देऊन या किडीचा प्रादूर्भाव कालावधी व नियंत्रण, तसेच प्रतिबंधात्मक उपाय व घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. बाल संगोपनाविषयी बालकांचे पोषण व संतुलित आहार यावर रजनी सरडगीकार यांनी याकडे महिला शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.  

या वेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. वळकुंडे, काजल जाधव, दिनेश क्षीरसागर, प्रा. किरण जाधव, ज्ञानेश्वरर तांदळे, नितीन बागल, अरुण गांगोडे, श्री. सुतार यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link