Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘इनोव्हिजन फेअर’
प्रेस रिलीज
Thursday, February 14, 2019 | 03:18 PM
15 0 0
Share this article:औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कॉमर्स विभागातर्फे ‘इनोव्हिजन फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून स्पार्क इंडस्ट्रीज ग्रुपच्या अध्यक्षा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्या सुनिता पाटसकर उपस्थित होत्या.

या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाटसकर म्हणाल्या, ‘छोटा-मोठा उद्योग व्यवसाय सुरू करून आपण त्याचे रूपांतर मोठ्या उद्योग-व्यवसायात करायला हवे. सुरुवातीच्या काळात आपण बँकांचे लोन घ्यावे; परंतु कायमच बँकांवर अवलंबून न राहता, आपण आपल्या उद्योग-व्यवसायामधून भांडवलाची निर्मिती करायला हवी.’‘महाविद्यालयातील तरुण मुला-मुलींनी उद्योग-व्यवसायात उतरायला हवे. समाजाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, असा व्यवसाय सुरू करायला पाहिजे. उद्योग व्यवसाय करताना आपण आपल्याभोवती सामाजिक वलय निर्माण करायला पाहिजे. हे करताना पैसा, प्रतिष्ठा यांबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करावा,’ असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या,  ‘महाविद्यालयातील मुलांना छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाची माहिती मिळावी आणि आपल्यामधून एखादा उद्योगपती व्हावा, या हेतूने या ‘इनोव्हिजन फेस्ट’चे आयोजन केले आहे. सुनिता पाटकर यांनी ब्युटी पार्लरच्या व्यवसायपासून सुरुवात करून स्पार्क इंडस्ट्रीज ग्रुपच्या  अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली आहे. आज त्यांच्या नावावर पाच कारखाने आहेत. आपण ठरवले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यांना नारीशक्ती, जेआरडी टाटा,  जनशक्ती अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामुळे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुनिता पाटणकर यांचा आदर्श घेऊन छोटा-मोठा उद्योग व्यवसाय सुरू करावा.’विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इनोव्हिजन फेअरच्या स्टॉलचे उद्घाटन पाटसकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. सुहास निंबाळकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन शॉर्टटर्म कोर्सच्या समन्वयक डॉ. सविता पाटील यांनी केले. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले. या वेळी उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्याध्यक्षा डॉ. शशी कराळे, प्रा. भीमराव पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search