Next
शिर्डीत मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी शिबिर
प्रेस रिलीज
Friday, March 23, 2018 | 04:21 PM
15 0 0
Share this storyशिर्डी : ‘श्री साईबाबा समाधी शताब्‍दी निमित्‍ताने येथील श्री साईबाबा संस्‍थान, गिव्‍ह मी फाईव्‍ह फाउंडेशन (औरंगाबाद) व असोसिएशन ऑफ प्‍लॅस्टिक सर्जन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी शिबिच्‍या माध्‍यमातून श्री साईबाबांनी सुरू केलेले रुग्‍ण सेवेचे कार्य घडले असून, पुढील काळात या शिबिराला संस्‍थान योग्‍य ते सहकार्य करेल,‘ अशी ग्‍वाही संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिली.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था शिर्डी, गिव्‍ह मी फाईव्‍ह फाउंडेशन व असोसिएशन ऑफ प्‍लॅस्टिक सर्जन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने तीन दिवसीय मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी कदम बोलत होते.

या वेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे, उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील, माजी विश्‍वस्‍त सुरेश वाबळे, उपवैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे, औरंगाबाद येथील प्‍लॅस्‍टीक सर्जन डॉ. राम चिलगर, सारंग देशमुख, परदेशातून आलेले तज्ज्ञ डॉक्‍टर, संस्‍थानचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक उपस्थित होते.

शिबीरात सुमारे १०० रुग्‍णांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी ७७ रुग्‍णांवर यशस्‍वीरीत्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. उरलेल्‍या २३ रुग्‍णांवर देखील येत्‍या शनिवारी (२४ मार्च २०१८) डॉ. राम चिलगर यांच्‍या उपस्थितीत शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये अवघड व गुंतागुतीच्‍या अशा भाजल्‍याने किंवा जन्‍मजात चिकटलेली मान, बोटे, हात आदींसारख्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या.

तैवानच्‍या डॉ. ह्युग ची चेन यांच्‍या नेतृत्‍वाखाली तैवान, सिंगापूर, थायलंड, इटली, फिलिपिन्स व पेरू या सहा देशांसह भारतातील केरळ, मुंबई व औरंगाबाद येथील अठरा प्‍लास्टीक सर्जन्‍सनी या शस्‍त्रक्रिया श्री साईनाथ रुग्‍णालयात विनामूल्य केल्‍या.

या प्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अग्रवाल, विश्‍वस्‍त वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरात मोलाचे योगदान देणाऱ्या परदेशातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा संस्‍थानतर्फे सत्‍कार करण्‍यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिक्षिका डॉ. पितांबरे यांनी केले. सूत्रसंचालन विकास शिवगजे यांनी केले. डॉ. रजनी साबळे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link