Next
‘इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट’ची पुण्यात सुरुवात
प्रेस रिलीज
Wednesday, February 20, 2019 | 12:19 PM
15 0 0
Share this article:पुणे : पूर्व, दक्षिण व उत्तरेकडील राज्यांमधून सर्वोत्कृष्ट रेसर्सची निवड केल्यानंतर आता ‘इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट’ने २०१९मधील आपला प्रवास पुण्यातून सुरू केला आहे. यानंतर होंडा टॅलेंट हंट कोईम्बतूरमध्ये (तामिळनाडू) २३ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित केले जाईल.

‘इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट’ हा ‘होंडा’चा उपक्रम असून, युवा रेसर्समधील गुण लहानपणापासून अगदी १३व्या वर्षीपासून शोधून काढण्याचे काम याद्वारे केले जाते. यामध्ये ‘होंडा टू-व्हीलर्स इंडिया’तर्फे पुण्यातील सर्वोत्तम युवा रायडर्सना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चॅम्पिअनशिप्समध्ये रेसिंग करिअर करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, आईझवल व दिल्ली या शहरांमध्ये झालेल्या पाच फेऱ्यांनंतर हंटच्या सहाव्या फेरीत १३ युवकांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला. यापैकी सर्वांत लहान स्पर्धक फक्त १३ वर्षांचा आहे.

यामध्ये स्पर्धकांना चाचणीच्या तीन फेऱ्या पार कराव्या लागल्या. पहिली फेरी शारीरिक तंदुरुस्ती, दुसरी फेरी रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन व जिगर आणि रेस ट्रॅकवरील रायडिंग कौशल्ये. त्यानंतर ज्युरींनी मुलाखत घेतली. ज्यात उमेदवार व त्यांच्या पालकांनाही प्रश्न विचारले गेले.  मोटरस्पोर्टविषयी त्यांना किती आत्मीयता व उत्साह वाटतो आणि या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा किती आहे हे यातून समजून घेण्यात आले. या ज्युरीचे प्रतिनिधित्व होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष प्रभू नागराज, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे मोटरस्पोर्ट्स विभागाचे डिव्हिजनल हेड चंदन बुर्दक व टेन१० रेसिंगचे डायरेक्टर रामजी गोविंदराजन यांनी केले.      पहिल्या टप्प्यात निवड झाल्यानंतर पुणे टॅलेंट हंटच्या सर्वोत्कृष्ट उमेदवारांना ‘होंडा टेन१० रेसिंग अॅकॅडेमी’मध्ये प्रशिक्षण दिले जाईल व दुसऱ्या टप्प्यात ट्रॅकवर राइड करण्याची संधी दिली जाईल. या उमेदवारांमधून ‘होंडा’ सर्वोत्कृष्ट रायडर्सची निवड करेल. त्यांनतर त्यांना काटेकोर प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक बळ व स्टॅमिनावर भर दिला जाईल. विशेष तज्ञ त्यांच्यातील रेसिंग कौशल्ये विकसित करतील. हे सर्वोत्तम रायडर्स १२ निवडक रायडर्ससोबत २०१९मधील होंडा टॅलेंट कप सीबीआर १५०आर विभागात रेसिंग करतील.

या वेळी ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’चे ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष नागराज म्हणाले, ‘इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट हा मोटरस्पोर्ट्समध्ये आम्ही सुरू केलेल्या नवीन उपक्रमाचा भाग असून, देशात युवा गुणांना, कौशल्यांना वाव देणे हा आमचा उद्देश आहे. भारतातील युवकांना सर्वोत्तम रायडर्स बनण्यासाठी विकसित करण्याचा संकल्प आम्ही घेतला असून, आमच्या टॅलेंट हंटमधील स्टार्स मिखाईलने व कृतिक हबीबने ‘इदेमित्सु होंडा टॅलेंट कप२०१८’ मध्ये अनुक्रमे पहिला व तिसरा क्रमांक पटकावला. पुण्यातील या फेरीत युवकांची मोटरस्पोर्ट्सबद्दलची जिगर व उत्साह पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. मला खात्री आहे की, हे नव्या पिढीचे रायडर्स भारतात मोटरस्पोर्ट्सचा चेहरामोहरा बदलवतील व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search