Next
जागतिक मधमाशी दिनानिमित्त ‘मधु उत्सवा’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, May 21 | 06:24 PM
15 0 0
Share this story

मधु उत्सवाचे उदघाटन करताना खासदार अनिल शिरोळे

पुणे : पहिल्या ‘जागतिक मधुमक्षिका दिवस’ च्या निमित्ताने, २० मे रोजी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था (सीबीआरटीआय), खादी व ग्रामोद्योग आयोगाने मधु उत्सवाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.  या वेळी त्यांच्या हस्ते लहान मुलांना मधाच्या बाटल्यांचे वाटपही करण्यात आले. या वेळी ‘हनी मिशन’ अंतर्गत कर्जत क्लस्टरमधील आदिवासींना मधपेट्यांचे वाटप करण्यात आले. एमएसकेव्हीआय बोर्डचे संचालक रमेश सुरंग, सीबीआरटीआईचे संचालक दीप वर्मा आणि माजी उपमुख्य अधिकारी मिलिंद वाकोडे उपस्थित होते.

या वेळी खासदार अनिल शिरोळे यांनी उपस्थितांना विशेषतः विद्यार्थ्यांना मधमाशी मित्र बनण्याचे आणि पर्यावरणरक्षक जीवनशैली संरक्षणासाठी मधमाशी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हनी मिशन’ सारख्या कार्यक्रमांतर्गत देश विकास कार्यात गतिमान होत आहे.  आता युनोला सुद्धा याचे महत्त्व समजले आहे. म्हणून २० मे ‘जागतिक मधुमक्षिका दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला.   मधुमक्षिकापालन उद्योगाच्या उन्नतीसाठी आणि मधुमक्षिकापालन उपक्रमात आवश्यक ते सर्व मदत केली जाईल. केरळसह महाराष्ट्रातील विविध भागातील मधमाश्या पालक आपल्या उत्पादनासह मधु उत्सवात सहभागी झाले होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link