Next
‘गानसरस्वती’ला स्वरसुमनांजली
BOI
Saturday, February 03 | 06:35 PM
15 0 0
Share this story

अपर्णा पणशीकरपुणे : गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या उपस्थितीत दर वर्षी रंगणारा आणि ‘नाटयसंपदा’तर्फे आयोजित केला जाणारा ‘गानसरस्वती’ महोत्सव यंदा त्यांच्या उपस्थितीशिवाय होत आहे. त्यांची उणीव रसिकांसह कलाकारांनाही हुरहूर लावणारी आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गायिका अपर्णा पणशीकर, बासरीवादक पंडित शशांक सुब्रह्मण्यम आणि उस्ताद राशीद खाँ यांनी आपली कला सादर केली. या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना स्वरसुमनांजली अर्पण केली. पुण्यातील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे तीन दिवस हा महोत्सव चालणार असून, त्याची सुरुवात शुक्रवारी (दोन फेब्रुवारी) झाली. 

किशोरीताईंच्या स्मृतींनी गहिवरलेल्या वातावरणात अपर्णा पणशीकर यांनी ‘रे बिरहा बमना’ ही भीमपलास रागातील बंदिश गायली, तर कर्नाटक शैलीतील बासरीवादक पं. शशांक सुब्रह्मण्यम यांनी हेमावती रागात रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उस्ताद राशीद खाँ यांच्या भावपूर्ण सादरीकरणानेही रसिक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांनी बागेश्री रागातील ‘प्यारी पिया संग’ ही तीन तालातील बंदिश सादर केली. त्यांच्या गायनाने या मैफलीची समाप्ती झाली.

(अपर्णा पणशीकर यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link