Next
जागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा
नागेश शिंदे
Friday, August 10, 2018 | 02:43 PM
15 0 0
Share this storyहिमायतनगर :
संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेला जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट २०१८ रोजी नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. हिमायतनगरमधील ‘ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्राइबल्स’च्या (ऑफ्रोट) वतीने आणि तालुक्यातील सर्व मूळ आदिवासी बांधवांकडून हा दिवस साजरा करण्यात आला.मौजे चिचोर्डी येथील नवयुवकांनी बिरसा मित्र मंडळाच्या नामफलकाचे अनावरण करून सामाजिक कार्यक्रमास सुरुवात केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस पाटील छत्रपती भिसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘ऑफ्रोट’चे नांदेड जिल्हाध्यक्ष मारोती धनवे, संघटक डॉ. माधव भुरके, हिमायतनगर तालुका अध्यक्ष रामदास डोखळे, तालुका उपाध्यक्ष संतोष डवरे, सचिव डॉ. डी. डी. गायकवाड, कोषागार ज्ञानेश्वर भडंगे, संघटक पंडित साबळे, संजय वाळके, नगरसेवक विनायक मेंडके, मारोती गवले, श्रीराम देशमुखे आदी उपस्थित होते. तसेच वानोळे, मनोजकुमार डवरे, फोले आदी हजर होते. या वेळी गावातील भगिनी महानंदा ढोले यांनी आपले मनोगत मार्मिक शब्दांत मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर धनवे, भडंगे, डवरे, साबळे, डोखळे, डॉ. भुरके आदी मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक भिसे यांनी केले. संदीप डवरे, लक्ष्मण बुरकुले, चिंतामणी तरटे, वसंत वागतकर, पांडुरंग वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. या वेळी गावातील महिला, पुरुष आणि लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

‘ऑफ्रोट’च्या कार्यकर्त्यांकडून शासकीय आदिवासी आश्रमशाळांना सदिच्छा भेटी
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘ऑफ्रोट’च्या कार्यकत्यांनी मौजे एकघरी, जिरोना येथील आश्रमशाळांना सदिच्छा भेट देऊन तेथील विद्यार्थांना मार्गदर्शन केले. संघटनेतर्फे एकघरी येथील शासकीय आश्रमशाळेत तेथील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेथील मु. अ. बुरकुले सर आणि त्यांच्या सर्व स्टाफने संघटनेचे अभिनंदन केले आणि जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Govind kale About 227 Days ago
Thanks for new चिंचोर्डी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा झालेली बातमी दिल्याबद्दल बिरसा क्रांती दल मौजे वाशी तर्फे अभिनंदन
0
0
Pintu karewad About 227 Days ago
Thanks for NeWS
0
0
Vinayak mendke About 227 Days ago
Thanks for news
0
0
Vinayak About 227 Days ago
Thanks for news
0
0
Nagesh shinde About 227 Days ago
Thank you sir
1
0
Vinayak About 227 Days ago
Thanks for new
2
0
Ganpat k. Dawre About 227 Days ago
Hii
1
0
Santosh Daware About 227 Days ago
Thanks for published our News for World indigenous peoples Day
1
0

Select Language
Share Link