Next
वेदांत कॉलेजमध्ये भरली युवा संसद
BOI
Tuesday, January 29, 2019 | 11:31 AM
15 0 0
Share this article:ठाणे : जिल्ह्यासाठी कल्याण येथील विठ्ठलवाडीमधील वेदांत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये युवा संसदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्ह्यामधील विविध महाविद्यालयांमधून निवडण्यात आलेल्या १८ ते २५ वर्षे वयोगटातील ५५ युवकांनी या संसदेमध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासासंबंधी आपले विचार व्यक्त केले.

युवकांमध्ये लोकशाही मूल्यांचे संस्कार, संसदीय पद्धतीचा आचार, दूरगामी विचार, हजरजबाबीपणा, वक्तृत्त्व व वाद-संवाद या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा युवा संसद हा उपक्रम राबविला जात आहे.  प्रत्यक्ष निवड चाचणी व डिजिटल माध्यमांचा वापर करून निवडलेल्या विद्यार्थ्यांनी या वेळी स्वच्छता, दारिद्र्य, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा, साम्यवाद, जातीयता, पर्यावरण सुरक्षा या मुख्य विषयांसह डिजिटल इंडिया, इंद्रधनुष्य, सुशासन, एक देश एक मतदान, जो खेलेगा वो खिलेगा-खेळ आणि फिटनेसचे महत्त्व आदी विषयांवर युवकांनी आपली मते व्यक्त केली. यासाठी त्यांना तीन मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. परीक्षकांनी दिलेल्या गुणांकावरून अमित ताम्हाणे, शंभवी जोशी, अक्षता देहरकर, ऋचा दिवटे, रविराज यादव या पाच विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावरील युवा संसदेसाठी करण्यात आली आहे.जिल्हा युवा संसदेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रशांत सावदेकर यांनी विद्यार्थ्यांना युवा संसदेचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रा. डॉ. हर्षल बच्छाव, पोलीस निरीक्षक श्रीकांत धामे, लायन्स क्लबचे नंदन पाटील, पत्रकार प्रफुल्ल केदारे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, वेदांत कॉलेजचे उपप्राचार्य मनीष वल्यानी, ‘एनएसएस’ कार्यक्रम अधिकारी योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search