Next
पडवळपाडा केंद्रशाळेला मिळाले आयएसओ मानांकन
दत्तात्रय पाटील
Thursday, March 07, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this article:ठाणे : शहापूर तालुक्यातील पडवळपाडा या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. ही ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची दुसरी व शहापूर तालुक्यातील पहिली ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा ठरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘आयएसओ’ मानांकन मिळाल्यानिमित्त पडवळपाडाचे केंद्रप्रमुख एफ. पी. गावित यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि पुण्यातील समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गावात मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘ओटाबू’ (Otabu) या संस्थेने शाळेचे परीक्षण करून (ISO 9001: 2015) मानांकन जाहीर केले. विद्यार्थ्यांचे लेझीम प्रात्यक्षिक तसेच ईशस्तवन व स्वागतगीतांनी केलेल्या स्वागताने मुंबई व पुण्यातील पाहुणे खुश झाले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पडवळ यांनी प्रास्ताविकातून ‘आयएसओ’साठी शाळेचे मुख्याध्यापक जयवंत सांबरे, रेणुका विशे व विजयकुमार देसले यांचे अथक परिश्रम, विविध संस्था, ग्रामस्थ, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांचे योगदान व त्यातून झालेला शाळेचा विकास उपस्थितांसमोर मांडला; तसेच सध्या शाळेतील सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
 


‘माझगाव डॉक’ व ‘कर्वे’ संस्थेच्या मान्यवरांनी शाळेतील  शिक्षकांचे व ग्रामस्थांचे कौतुक करत भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यादरम्यान दोन्ही संस्था, तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ धाऊदादा पडवळ यांच्याकडून शाळेतील राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक विजयकुमार देसले यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेमार्फत ई-लर्निंग सुविधेचा सुयोग्य वापर करणाऱ्या निमनपाडा, अंबरपाडा व चांग्याचापाडा हायस्कूल या शाळांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ‘माझगाव डॉक’चे प्रमुख टी. व्ही. थॉमस, जनरल मॅनेजर डॉ. जे. एम जहांगीर, कार्यक्रम अधिकारी व्ही. पी मेहता, सुरेश कदम, इजाज अहमद, प्रदीप महाडेश्वर, रोहित पंडित, विकास कौशिक, कर्वे समाजसेवी संस्थेचे प्रमुख डॉ. महेश ठाकूर, कार्यक्रम अधिकारी चयन पारधी, रूपेश पवार, खराडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय विशे, ग्रामपंचायत सदस्य विनायक पडवळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वसंत कथोरे व सर्व सदस्य, शिक्षक-पालक व माता पालक संघाचे पदाधिकारी, निवृत्त केंद्रप्रमुख निर्मला पाटील, प्रकल्प समन्वयक स्नेहल नाईक, धनंजय गीते, आरती गीते, क्षेत्र समन्वयक सुहास जाधव, नितीन पाटील, कविता ढोकरे, किशोरी ठकार, पडवळपाडा बीटातील व खराडे केंद्रातील शाळांचे प्रमुख, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विविध बचत गटांच्या महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search