Next
अक्कलकोट समाधी मठात यश राणेचा कौतुक सोहळा
प्रेस रिलीज
Thursday, July 25, 2019 | 04:20 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत बालपणीच्या दत्तांची भूमिका साकारणाऱ्या यश राणे याचा सत्कार अक्कलकोट येथील हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या स्वामींच्या समाधी मठात करण्यात आला. या सन्मानाने चिमुकला यश भारावून गेला. 

‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जात असून, यात २४ गुरु प्राप्त करण्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे. या मालिकेत यश राणे हा बालकलाकार दत्तांची बालपणीची भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सेटवरही अनेक चाहते भेट घेऊन या मालिकेच्या निमित्ताने श्री दत्तुगुरुंच्या अवताराची गोष्ट पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रियाही देत आहेत.

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच गुरु-शिष्य परंपरा अनुभवण्याची संधी मिळत आहे. ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेची लोकप्रियता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. याच प्रेमापोटी अक्कलकोट इथल्या समाधी मठात बालदत्तांची भूमिका साकारणाऱ्या यशला आवर्जून बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला.

बालदत्तांच्या अवताराला भरभरून प्रेम मिळत आहे. लवकरच या मालिकेत दत्तगुरुंचा २४ गुरु प्राप्त करण्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. ज्या शक्तीला, निसर्गाला मनुष्यप्राणी रोज पाहतो; मात्र त्यातून बोध घेण्यास विसरतो. आयुष्याला दिशा देणारे हेच खरे गुरु असतात. हे २४ गुरु नेमके कोण, त्यांनी दत्तगुरुंना नेमकी कोणती शिकवण दिली, आणि त्या शिकवणीचा फायदा आत्ताच्या पिढीला कसा होईल, हे मालिकेतून पाहायला मिळणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search